करण पटेल बनला बाबा

    दिनांक :16-Dec-2019
|
छोट्या पडद्यावरील मोस्ट पॉप्युलर कपल करण पटेल आणि अंकिता भार्गवच्या घरी एका नन्ही परीचे नुकतेच आगमन झाले आहे. अंकिताने 14 डिसेंबरला एका क्यूट मुलीला जन्म दिला असून करणनेच ही गुड न्यूज मीडियाला दिली आहे. त्याने मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, मी खूप खूश असून मला काय बोलायचे हेच सुचत नाहीये. अंकिता आणि आमच्या बाळाची तब्येत चांगली आहे. आमच्या कुटुंबियांच्या नेहमीच पाठिशी उभे राहिल्याबद्दल मी माझ्या फॅन्सचे आभार मानतो.
 

karan-ankita_1   
 
करणने कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, केसर, काव्यांजली, करम अपना अपना, यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही ये है मोहोब्बते या मालिकेमुळे मिळाली. तो नुकताच खतरों के खिलाडी या मालिकेत देखील झळकला होता. करणप्रमाणेच अंकिता देखील अभिनेत्री आहे. तिने केसर, देखा एक ख्वाव आणि रिपोर्टस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.