अरबाजमुळे आपसात भिडल्या मलायका - उज्ज्वला

    दिनांक :16-Dec-2019
|
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांना एकमेकांशी विभक्त होऊन बराच काळ झाला. एवढेच नाही तर दोघेही आपआपल्या गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडसोबत आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. मात्र, असे असतानाही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते दोघं नेहमीच चर्चेत असतात. अरबाजमुळे मलायका व सुपरमॉडेल उज्ज्वला राऊत यांच्यात भांडण होत असल्याचे म्हटले जात आहे. यामागचे कारण अरबाज आणि उज्ज्वला यांच्यात सोशल मीडियावर होणारा संवाद आहे, असे सांगितले जात आहे.
 

ujjwala_1  H x  
‘सुपरमॉडेल ऑफ द इअर’ या रिअॅलिटी शोच्या नव्या सिझनमध्ये मलायका परीक्षक म्हणून काम करत आहेत. याच शोमध्ये उज्ज्वला मेंटर म्हणून सहभागी झाली आहे. पिंकविला या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, या शोच्या सेटवरील लोकांना उज्ज्वला तिचे अरबाजसोबतचे चॅट्स दाखवत असते. कशाप्रकारे अरबाज तिच्याशी चॅट करतो आणि ते दोघं एकमेकांना फोटोसुद्धा पाठवतात, हे सर्व उज्ज्वला सेटवरील इतर लोकांना दाखवत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच मलायका व उज्ज्वला यांच्यात सेटवर शीतयुद्ध सुरू आहे. मलायका व उज्ज्वला यांच्यातील वादामुळे शोटी टीम दोघांना वेगवेगळे ठेवून शूट पूर्ण करत असल्याचेही वृत्त आहे.