'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

    दिनांक :17-Dec-2019
|
नवी दिल्ली,
झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय'ची ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली होती. त्यामुळे 'गली बॉय'कडून सर्वांनाच भरपूर अपेक्षा होत्या. परंतु, गली बॉय ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परदेशी अंतिम १० चित्रपटांमध्ये गली बॉयचा समावेश झालेला नाही. 
 
gully _1  H x W
 
द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँण्ड सायन्सकडून परदेशी विभागात शेवटच्या दहा चित्रपटांची नावे जाहीर करण्यात आली. या अंतिम दहा चित्रपटांच्या यादीत 'गली बॉय'चा समावेश नाही.
 
द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँण्ड सायन्सने नऊ विभागातील पुरस्कारांची यादी जाहीर केली. यामध्ये डॉक्युमेंटरी फीचर, डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट, इंटरनॅशनल फीचर फिल्म, मेकअप अॅण्ड हेअर स्टायलिंग, म्युझिक (ओरिजनल स्कोअर), म्युझिक (ओरिजनल सॉन्ग), ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म, व्हिज्युअल इफेक्ट्स या विभागांचा समावेश आहे.
 
 
या विभागात झेक रिपब्लिकचा द पेंटेड बर्ड, इस्टोनियाचा ट्रूथ अँण्ड जस्टिस, पोलंडचा कोर्पस क्रिस्टी, रशियाचा बीनपोल, सेनेगलचा अटलांटिक्स, फ्रान्सचा लेस मिजरेबल्स, हंगेरीचा दोज हू रिमेन्ड, नॉर्थ मॅसेडोनियाचा हनीलॅण्ड, दक्षिण कोरियाचा पॅरासाईट या चित्रपटांचा समावेश आहे.