‘कॅब’विरोधकांनी शाहरुखला भडकविले

    दिनांक :18-Dec-2019
|
मुंबई,
नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून िंहसाचार सुरू असताना, प्रख्यात चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या मौन भूमिकेवर अभिनेता रोशन अब्बास याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाहरुख, तू स्वत: जामिया विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असताना, या विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायावर तू गप्प कसा कसा, असा सवाल अब्बासने केला.
 

shah rukh khan_1 &nb 
 
दगडफेक करणार्‍या जामियामधील विद्यार्थ्यांवर पोलिसांना कारवाई करावी लागली. समाज माध्यमांवरही तीव्र पडसाद उमटले. सर्वसामान्यांसह बॉलीवूड कलाकारांनीही आपले मत मांडले. मात्र, काही कलाकार शांत असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.
 
रेडिओ जॉकी आणि अभिनेता रोशन अब्बास याने टि्‌वटरच्या माध्यमातून शाहरुख खानला मौन बाळगल्याबद्दल प्रश्न विचारला. हे टि्‌वट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. शाहरुख, तू या घटनेवर काहीतरी बोलायला हवे. तू तर जामियाचा विद्यार्थी आहेस! तुझे तोंड कोणी बंद करून ठेवले आहे? सध्या सुरू असलेल्या गदारोळाबद्दल तू काहीच बोलायला तयार नाही, असे टि्‌वट अब्बासचे केले आहे.