कंगनाचा 'पंगा' चित्रपटातील फोटो केला शेअर

    दिनांक :19-Dec-2019
|
मुंबई,
अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कंगना रनौट सध्या वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतेय. तिचा आगामी चित्रपट 'पंगा' या चित्रपटातही ती हटके भूमिकेत दिसणार आहे. बहिण रंगोली चंदेलने या चित्रपटातील कंगनाचा लुक शेअर केला आहे. 'मणिकर्णिका' नंतर या चित्रपटात कंगना पुन्हा एकदा आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
 

kangana ranaut_1 &nb 
 
फोटो शेअर करताना रंगोलीनं लिहिलं की, कंगना म्हणते जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला आईची भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात येतं तेव्हा तो तिचा अपमान असतो. पंरतू 'मणिकर्णिका'मध्ये आईची भूमिका यशस्वीरित्या साकारल्यानंतर कंगना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा आई साकारताना दिसणार आहे. यशाच्या शिखरावर असणारी अभिनेत्री आईची भूमिका साकारत आहे. हा नवा भारत आहे, ज्याला 'पंगा' घ्यायला आवडते, असे रंगोलीने म्हटले आहे.
 
 
 
हा चित्रपटत येत्या २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी करणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात रिचा चड्ढा, नीना गुप्ता, जस्सी गिल आणि पंकज त्रिपाठीही मुख्य भूमिकेत असणार आहेत.
 
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्येही कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.