'मर्दानी-२' ची सहा दिवसात २५.५० कोटींची कमाई

    दिनांक :19-Dec-2019
|
मुंबई,
महिलांवरील अत्याचाराचे अस्वस्थ करणारे वर्तमान आणि त्याविरोधात न्यायाची आपापली व्याख्या असलेले सध्याचे समाजमन या पार्श्वभूमीवर अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी-2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवपासून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.  
 

mardani 2_1  H  
 
 
‘पानिपत’आणि ‘पती पत्नी और वो’ या दोन हिंदी चित्रपटांसोबत 'मर्दानी'ची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा असून मर्दानीने मात्र बाजी मारल्याचे चित्र आहे. 'मर्दानी-2' चित्रपटाने गेल्या सहा दिवसांत २५.५० कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ३.३० कोटी तर दुसऱ्या दिवशी ६.५० कोटींचा गल्ला जमावला आहे. तर तिसऱ्या दिवशी कंपनीने ७ ते ८ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी ३ कोटी आणि पाचव्या दिवशी २.५० कोटींचा व्यवसाय चित्रपटानं केला. दिग्दर्शक गोपी पुथरन 'मर्दानी -2' चे दिग्दर्शन केले आहे. गोपी यांनीच 'मर्दानी'ची पटकथाही लिहिली होती.
 
चित्रपटातील राणीच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समिक्षकांनी देखील कौतुक केले असून २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या‘मर्दानी’चित्रपटाचा हा त्याचा दुसरा भाग आहे. बलात्कारानंतर मुलींची निर्घृणपणे हत्या करून भलतीच ‘प्रसिद्धी’ मिळवण्यासाठी चटावलेल्या एका विकृतीवर प्रहार करणारी रणरागिणी या चित्रपटाची ‘नायक’ आहे.