‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता मराठीत

    दिनांक :19-Dec-2019
|
छोट्या पडद्यावरील सध्याची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका तब्बल दहा वर्षे प्रेक्षकांचे मनोरंन करण्यात यशस्वी ठरली आहे. मालिकेतील मुख्य भूमिकेतील दयाबेन उर्फ दिशा वकानीने शो सोडल्यामुळे मालिकेच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे मालिका चर्चेत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता मराठीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी प्रेक्षकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
 
 

gokuldham_1  H  
 
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका फक्त मराठी या वाहिनीवर ‘गोकुळधामची दुनियादारी’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. नुकताच या मराठी व्हर्जनचा प्रमो प्रदर्शित करण्यात आला आहे. चाहत्यांना तो प्रचंड आवडत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. २४ डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चार विंग असणारी गोकुळधाम ही सोसायटी गोरेगाव पूर्व, मुंबईच्या पावडर गल्लीतील काल्पनिक निवासी संस्था आहे. मालिकेची कथा या सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांभोवती फिरता दिसणार आहे. ‘गोकुलधामची दुनियादारी’ हे मूळ मालिकेचे डब व्हर्जन असणार आहे.
 
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका १८ जुलै २००८ रोजी सुरु झाली होती. आता या मालिकेचे २८०० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. आता ही मालिका मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणास सज्ज झाली आहे.