नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

    दिनांक :02-Dec-2019
|
 
 
nanar _1  H x W
 
मुंबई, 
गेल्या वर्षी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान आंदोलकांनी कायदा हातात घेतल्याने पोलिसांकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे नाणारविरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे यांनी आरे मेट्रो आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पुढे आली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी हे गुन्हे मागे घेतले आहेत.