जगामध्ये कुठेही खेळू शकणार आयपीएलचे संघ

    दिनांक :02-Dec-2019
|
मुंबई,
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून क्रिकेटसाठी बरेच महत्वाचे निर्णय माी कर्णधार सौरव गांगुली यांनी घेतले आहेत. आता तर आयपीएलमधील संघ जगभरात कुठेही खेळू शकतात, असा मोठा निर्णयही त्यांनी घेतल्याचे समजते आहे.

ipl _1  H x W:
 
आयपीएल ही भारतामध्ये खेळवली जाते. पण ही स्पर्धा खेळवण्यात जेव्हा काही समस्या असेल तेव्हा देशाबाहेरही आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. आता तर आयपीएलचे संघ जगभरात कुठेही खेळू शकतात, असे म्हटले जात आहे.
 
आयपीएल हे बहुतांशी भारतात होते. त्यामुळे जगभरातील चाहत्यांना या सामन्यांचा आनंद लुटता येत नाही. त्यामुळे जगभरातील चाहत्यांना आयपीएलच्या संघाचे सामने आपल्या घरच्या मैदानात पाहता यावेत, यासाठी ही गोष्ट करण्यात येणार आहे. क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही गोष्ट बीसीसीआय करणार आहे.
 
आयपीएलच्या संघांना जिथून जगभरातून निमंत्रण मिळे, तिथे त्यांचा सामना खेळवण्यात येईल. आयपीएलच्या दोन संघांमध्ये यावेळी मैत्रीपूर्ण सामना रंगणार आहे. पण हे सामने भरवण्यासाठी बीसीसीआयला नेमकी किती रॉयल्टी मिळणार आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ही गोष्ट अडलेली असल्याचे म्हटले जात आहे.