काँग्रेसच्या रॅलीत 'प्रियांका चोप्रा झिंदाबाद'चे नारे ; व्हिडिओ व्हायरल

    दिनांक :02-Dec-2019
|
नवी दिल्ली,
काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते 'प्रियांका चोप्रा झिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ काँग्रेसच्या जनसभेतला असल्याचे सांगितले जात आहे. 
 
 priyanka _1  H
 
 
व्हिडीओमध्ये माजी आमदार सुरेंद्र कुमार यांचा उल्लेख आहे. याशिवाय दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रादेखील यामध्ये दिसत आहेत.
 
 
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ ३७ सेकंदांचा आहे. त्यात घोषणा देणाऱ्या व्यक्तीने गांधी कुटुंबांचा उल्लेख करताना प्रियांका यांचे आडनाव चुकवले आहे. 'सोनिया गांधी झिंदाबाद, काँग्रेस पार्टी झिंदाबाद, राहुल गांधी झिंदाबाद, प्रियंका चोप्रा झिंदाबाद,' अशा घोषणा व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने दिल्या. त्यानंतर त्याला त्याची चूक लक्षात आली. मग लगेच दुसऱ्याच क्षणी 'सॉरी प्रियंका गांधी झिंदाबाद, सोनिया गांधी झिंदाबाद' म्हणत त्याने घोषणाबाजी सुरू ठेवली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.