आणखी 6 विमानतळांचे खाजगीकरण होणार

    दिनांक :02-Dec-2019
|
नवी दिल्ली,
केंद्र सरकार सरकार देशातील आणखी 6 विमानतळांचे खाजगीकरण करण्याच्या विचारात आहे. फेब्रुवारीमध्ये सरकारने सार्वजनिक-खाजगी भागिदारी अंतर्गत लखनौ, अहमदाबाद, जयपूर, मंगळुरू, तिरुअनंतपुरम्‌ आणि गुवाहाटीमधील विमानतळांचे खाजगीकरण केले होते. यानंतर आणखी सहा विमानतळांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरणाने केंद्र सरकारला दिला आहे.
 

airport_1  H x  
 
यात अमृतसर, वाराणसी, भुवनेश्वर, इंदूर, रायपूर आणि त्रिची (तिरुचिरापल्ली) या विमानतळांचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच आणखी सहा विमानतळांचे खाजगीकरण होऊ शकते.
 
फेब्रुवारीमध्ये सहा विमानतळांचे खाजगीकरण करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला दिली. यानंतर आता प्राधिकरणाने आणखी सहा विमानतळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये खाजगीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे.