आयुषमान गाठतोय यशाची पायरी !

    दिनांक :02-Dec-2019
|
आयुषमान खुराना दिवसेंदिवस यशाची एक एक पायरी चढतो आहे. आयुषमानच्या 'विकी डोनर', 'अंधाधून', 'बधाई हो', 'बाला', 'बरेली की बर्फी', 'आर्टिकल १५', 'ड्रिम गर्ल' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवले आहे. त्यामुळे त्याला मिळणाऱ्या जाहिरातींमध्ये वाढ झाली आहे.
 

ayushmann_1  H  
 
२०१८ मध्ये आयुषमान पाच उत्पादनांची जाहिरात करत होता. या वर्षात त्याच्याकडे वीस जाहिराती आहेत. यात मोबाइल फोन कंपनी, कपडे, महागडी घड्याळं, आयवेअर अशा नामांकित ब्रँडसचा समावेश आहे. त्यामुळे आयुषमानचा भाव सध्या चांगलाच वधारल्याचे दिसून येत आहे.