मेक्सिकोत सुरक्षा जवान-तस्करांंमध्ये गोळीबार, 19 मृत

    दिनांक :02-Dec-2019
|
मेक्सिको,
मेक्सिकोमध्ये सुरक्षा जवान आणि मादक द्रव्य तस्करांच्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना मेक्सिकोच्या टेक्सास सीमेजवळ घडली. दरम्यान, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

mexico_1  H x W 
 
माहितीनुसार, सुरक्षा जवान आणि तस्कर यांच्यात सुमारे तासभर झालेल्या गोळाबारात 19 जणांचा मृत्यू झाला असून, यात चार पोलिस अधिकारी, दोन नागरिक आणि 13 तस्करांचा समावेश आहे. शिवाय अनेकजण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
काही महिन्यांपूर्वी मेक्सिकोतील गुआनाजुआटो राज्यातील एका नाईट क्लबमध्ये एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला होता, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी 22 जुलैला कॅनडामधील टोरांटो शहरातील ग्रीक टाऊनमध्ये अंदाधुंद गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य 13 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश होता. यात हल्लेखोरदेखील ठार झाला होता.