हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा तुरुंगात पाहुणचार

    दिनांक :02-Dec-2019
|
हैदराबाद,
हैदराबाद येथे मानवतेला काळीमा फासणारी अशी दुर्दैवी घटना घडली. हैदराबाद येथील महिला पशुवैद्यकाच्या बलात्कार आणि खून प्रकरणावर संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत आहे. मात्र, याच प्रकरणातील आरोपी नराधमांना तुरुंगात खाण्यासाठी मटन करी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नियमानुसारच या आरोपींना जेवण दिल्याचा खुलासा करण्यात येत असला तरी या नराधमांना मटन करी देण्याची गरज काय होती? असा प्रश्न विचारला जात आहे. 
 
hydrabad_1  H x 
 
या प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबादच्या चेरापल्ली येथील हाय सेक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या चारही आरोपींना दुपारच्या जेवणात दाळ-भात देण्यात आला. मात्र, रात्रीच्यावेळी त्यांना मटन करी देण्यात आली. जेल मॅन्युअलनुसारच या आरोपींना जेवण देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या नराधमांना तुरुंग प्रशासनाने मटन करी दिलीच कशी? हे आरोपी मोठी कर्तबगारी बजावून तुरुंगात आले होते काय? असा संतप्त सवाल देशभरातून विचारला जात आहे.