किशोरी शहाणे झळकणार वेब सीरिजमध्ये

    दिनांक :02-Dec-2019
|
मुंबई,
मराठी बिग बॉसमध्ये चमकल्यानंतर एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे आता वेब दुनियेकडे वळल्या आहेत. 'चार्जशीट' ही नवी हिंदी वेब सीरिज त्या करत आहेत.
 

kishori _1  H x 
ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध असलेल्या एका बॅटमिंटनपटूच्या हत्या प्रकरणावर आधारित अशी ही कथा आहे. किशोरी यात गायत्री दीक्षित नावाची एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. या भूमिकेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच काहीशी ग्रे शेड असलेली ही भूमिका त्या साकारत आहेत.