महाआघाडीच्या कार्यकर्त्यांची महारॅली

    दिनांक :02-Dec-2019
|
शेंदुरजनाघाट, 
स्थानिक शेंदुरजनाघाट नगरीत महाआघाडीच्या वतीने उध्दव ठाकरे यांची मु‘यमंत्रीपदी निवड झाल्याची बातमी कळताच भव्य थाटात महारॅलीचे आयोजन करण्यात आले. सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाल्याने रॅलीला विशेष महत्त्व आले. ही रॅली मलकापूर येथून निघून थेट शिवसेना चौक येथे थांबून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवर व कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक‘माची सांगता करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख अजय सरोदे, युवा सेना तालुका प्रमुख अकुंश मोघे, युवा शहर प्रमुख आशीष विटाळक़र, नगर सेवक भूपेंद्र कुंवारे, कपिल तरार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 

mahaaaghadi raily_1