महेश कोठारेंच्या सुनेचा मेकओव्हर

    दिनांक :02-Dec-2019
|
अभिनय आणि नृत्यात पारंगच असलेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री व महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारेने  मेकओव्हर केला आहे. मेकओव्हर नंतर केलेल्या फोटोशूटमधला एक फोटो तिने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये उर्मिलाला ओळखणेही कठीण होत आहे. उर्मिलाचा हा मेकओव्हर नेटकऱ्यांसोबतच अभिनेत्रींनाही खूप आवडला आहे.
 

urmila _1  H x  
‘स्त्रीकडे असलेली सर्वात मोहक संपत्ती म्हणजे आत्मविश्वास’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. या कॅप्शनप्रमाणेच तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि तिची भेदक नजर नेटकऱ्यांना भुरळ पाडत आहे. या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. क्रांती रेडकर, गिरीजा ओक, फुलवा खामकर यांनी कमेंट्समध्ये उर्मिलाची प्रशंसा केली आहे.