क्रिकेटपटू मनीष पांडे अडकला लग्नाच्या बेडीत

    दिनांक :02-Dec-2019
|
मुंबई,
सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यात खेळून संघाला विजय मिळवून देणारा क्रिकेटपटू मनीष पांडे आज  सोमवारी लग्नाच्या बेडीत अडकला. मनीष पांडेने दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत लग्न केले आहे. या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

nisha _1  H x W
गुजरातमधील सूरतमध्ये खेळवण्यात आलेला सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा सामना रविवारी रात्रीपर्यंत रंगला होता. कर्नाटककडून खेळणाऱ्या मनीष पांडेने संघाला विजय मिळवून दिला व दुसऱ्याच दिवशी लग्नाचा बार उडवून दिला. महिनाभरापूर्वी मनीष पांडे व अभिनेत्री अश्रिता शेट्टी या दोघांच्या लग्नावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. ती अखेर आज खरी ठरली. मनीष पांडेच्या कुटुंबाने या चर्चेला दुजोरा देत या दोघांचे २ डिसेंबर रोजी विवाह असल्याची माहिती दिली होती. सोमवारी (२ डिसेंबर) रोजी मुंबईत मनीष पांडे आणि अश्रिता हे दोघे पवित्र बंधनात अडकले. कर्नाटक संघाचा कर्णधार असलेला व ट्रॉफी जिंकल्यानंतर मनीष पांडेने आज लग्न करणार असल्याची माहिती काल दिली. 

nisha _1  H x W 
 
मूळचा उत्तराखंडचा असलेल्या मनीष पांडेने उत्तराखंडच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. काही दिवसापूर्वीच मनीषच्या कुटुंबाने या लग्नाविषयी अधिकृत माहिती दिली होती. सूरत येथे खेळल्या गेलेल्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफच्या फायनलमध्ये विजय मिळाल्यानंतर मनीष पांडे सरळ मुंबईसाठी रवाना झाला. आज त्याने रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. या जोडप्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १ डिसेंबर रोजी क्रिकेटच्या मैदानावर खेळून संघाला विजय मिळवून दिला तर २ डिसेंबर रोजी अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत विवाह बंधनात मनीष पांडे अडकला आहे. लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर मनीष पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. ४ किंवा ५ डिसेंबर रोजी हैदराबाद मध्ये होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी रवाना होण्याची शक्यता आहे. हा सामना ६ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईत होणार होता. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव तो हैदराबाद येथे होणार आहे. मनीष पांडेने भारतीय संघात २०१५ साली पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने २३ वनडे, ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २३ वनडे सामन्यात त्याने ४४० धावा केल्या आहेत. तर एक शतक व २ अर्धशतक ठोकले आहेत. टी-२० च्या सामन्यात ५८७ धावा केल्या आहेत.