IIT विद्यार्थ्याला मायक्रोसॉफ्टने दिले १.१७ कोटींचे पॅकेज

    दिनांक :02-Dec-2019
|
मुंबई,
आयआयटी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पहिल्या दिवशी कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना घसघशीत पॅकेज देण्यात आले. पहिल्या दिवशी पहिल्या टप्प्यात १८ कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली. यात मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून १.१७ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले. उबर कंपनीने १.०२ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. तर देशी कंपन्यांमध्ये कॉलकॉम कंपनीकडून सर्वाधिक ३२.५९ लाख रुपयांचे पॅकेज तर गुगल कंपनीकडून ३२ लाख रुपयांचे पॅकेज विद्यार्थ्याला दिले गेले.
 

iit bombay_1  H 
आयआयटी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पहिल्या दिवसाचा दुसरा टप्पा रात्री २ वाजेपर्यंत सुरू होता. आणखी कंपन्या पुढील दिवसांत येणार असल्याची माहिती आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे. यंदा मंदीमुळे आयआयटीच्या प्लेसमेंट कमी होतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. असे असले तरी यंदा अपेक्षापेक्षा चांगली नोंदणी झाल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
 
मागील वर्षी पहिल्या दिवशी २१ कंपन्यांनी नोंदणी केली होती. यंदा ही संख्या १८ इतकी झाली आहे. यंदा पहिल्या दिवशी ११० विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत तर १७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा डॉलरची किमंत कमी वाढल्याने परदेशी कंपन्यांनी देऊ केलेल्या पॅकेजचे मूल्य वाढले आहे. तर देशातील अपॉइंटमेंटला दिलेले पॅकेज हे गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे.