शेतकरी सुखावला! कांद्याला मिळाला ११० रु. किलो बाजारभाव

    दिनांक :02-Dec-2019
|
मुंबई,
दुष्काळ आणि परतीचा पाऊस यामुळे उभी कांद्याची पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र हाच कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणत आहे. शिरूर तालुक्यातील तांदळी गावाचे शेतकरी मुक्ताजी गदादे या शेतकऱ्याच्या 23 पिशवी कांद्याचे 1 लाख रुपये मिळाल्याने सध्या हा शेतकरी लखपती झाला आहे. गदादे यांनी आपला कांदा सोलापूर येथील बाजार समितीत पाठवला होता तेथे त्यांच्या कांद्याला किलोला 110 रूपये बाजारभाव मिळाल्याने गदादे अवघ्या 23 पिशव्यांत लखपती झाले आहेत.
 
farmer happy_1  
 
पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जाते कांदा या पिकाला मोठा भांडवली खर्चही करावा लागतो मात्र कांदा काढणीच्या वेळी कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो आणि शेतकरी कर्जबाजारी होतो आणि हाच शेतकरी आता कर्जबाजारी होत चाललाय तर दुसरीकडे साठवणुकीत ठेवलेल्या खांद्यातून काही शेतकरी लखपती होत चाललेत.मात्र पुढील काळात शेतमालाल हमीभाव दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी करत आहेत.