अजगराला दिले जीवनदान

    दिनांक :02-Dec-2019
|
 
ajgarala jiwandan_1 
 
भद्रावती, 
वन्यजीव संवर्धन व पर्यावरण रक्षण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सार्ड या संस्थेच्या सदस्यांनी एका अजगरास जंगलात सोडले.
एनटीपीसी नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन वसाहतीमध्ये एक मोठा साप असल्याची माहिती सार्ड संस्थेच्या सदस्यांना मिळाली. त्यांनी वसाहत गाठली आणि त्या अजगरास सुरक्षितरित्या पकडले. हा अजगर नेहाल भागवते व रुपेश आत्राम यांनी पकडला. त्याबरोबरच स्वप्नील जुमडे, अक्षय क्षीरसागर, वैभव कक्कर, निखिल लोहकरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी सापाविषयाची उपस्थित लोकांना देण्यात आली. जंगलांची कमतरता आणि खाद्याचा अभाव यामुळे मोठ्या सापांचे लक्ष आता उंदीर, घुशी खाण्यासाठी मानवी वस्त्याकडे लागलेले आहे. त्यामुळे ते मानवी वस्त्याकडे येतात. आपली उपजीविका करतात. असे साप आढळल्यास त्यांना न मारता लोकांनी सामाजिक संस्थांना याची माहिती द्यावी. जेनेकरुन माहिती दिल्यास अनेक सापांना जीवदान मिळू शकते. या सापाचे इंग‘जी नाव इंडियन रॉक पायथॉन तर मराठीमध्ये अजगर असे आहे. त्याची लांबी अंदाजे नऊ फुट असून, वजन 14 किलो आहे. या अजगराच्या माहितीची नोंद वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात करण्यात आली. त्यानंतर वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सदस्यांनी अजगराला जंगलात सुरक्षितस्थळी सोडले.