एसटीतील वायफाय सेवा ठरली दिवास्वप्न

    दिनांक :02-Dec-2019
|
मोर्शी, 
राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यातील वाय-फाय सेवा केवळ दिवास्वप्नच ठरल्याचे सिद्ध झाले आहे. या गाड्यातील वाय-फायचे काही बॉक्स गायब झाल्याचे दिसून येत आहे, तर काही गाड्यांमध्ये बॉक्स असूनही सेवा मात्र ठप्प आहे.
सन 2014-15 च्या दरम्यान शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते असताना महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास करताना मनोरंजन व्हावे या उद्देशाने गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा पुरवण्यात आली होती. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाची सेवा देणार्‍या काही लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये प्रवासासाठी मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र आता ही सेवा बंद पडल्याने प्रवासी संभ‘मात पडले आहे .
लांब पल्ल्यावरच्या एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांना ही वाय-फाय सुविधा मनोरंजन तसेच माहिती मिळविण्यासाठी सोयीची झाली होती. अशा सेवेमुळे प्रवाशांचा कल खाजगी वाहतुकीकडे कमी होऊन तो एसटीकडे वाढला होता. परंतु आता एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोफत वायफायची सेवा दिसून येत नाही. त्यामुळे लालपरीची वाय-फाय सेवा गेली कुठे, असा प्रश्र्न प्रवाशांना पडला आहे. दिवसेंदिवस स्मार्टफोन वापरणार्‍यांची सं‘या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे . डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना साकार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेसमध्ये वाय-फाय ही सेवा प्रवाशांना उपलब्ध करून दिली होती. राज्यात अनेक ठिकाणी आगारात मोफत वायफायची सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. एसटीने प्रवास करणारे अनेक प्रवासी इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारचे ज्ञान घेत होते आणि मनोरंजन सुद्धा होत होते. राज्य परिवहन महामंडळाला वायफाय ही सेवा पुरवणार्‍या कंपनीकडून वाय-फाय सेवा देणार्‍या यंत्रात काही बिघाड झाल्यास हे यंत्र दुरुस्तीसाठी टेक्निशियनची नियुक्ती आगारात केल्या जात होती. आता मात्र अनेक एसटीच्या गाड्यामधील वाय-फायच्या पेट्याच गायब झालेल्या आहे .
बसमध्ये प्रत्येक सीटसमोर लाल रंगाचे स्टिकर लावलेले असायचे. तेथे ही सुविधा कशी वापरायची याबाबत इत्थंभूत माहिती असायची. आता बसमधील वायफाय सेवा बंद झाली असली तरी बसमध्ये हे स्टिकर आजही दिसून येते.
 
 
st wifi _1  H x
 
मोबाईल चार्जरची सोय हवी
हल्ली अनेक प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांनी प्रवास करीत असून स्मार्टफोन वापरण्याची सं‘याही लक्षणीय आहे. पण स्मार्ट फोनची बॅटरी प्रवासादरम्यान लवकर उतरत असल्यामुळे नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या एसटीच्या गाड्यांमध्ये मोबाईल चार्जिंगची सोय उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी प्रवासी करीत आहे .
(एएम 02 डीसी - वायफाय)