ट्रॅफिक जॅमला वैतागून तरुणाने साकारले हेलिकॉप्टर

    दिनांक :02-Dec-2019
|
जकार्ता,
इंडोनेशियामधील ट्रॅफिक जॅमला वैतागलेल्या एका तरुणाने ट्रॅफिक जॅमवर भारी उपाय शोधून काढला आहे. रोजच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकण्यापेक्षा त्याने असे काही करून दाखवले आहे की, त्याच्या या कामगिरीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडोनेशियातील जकार्तामध्ये राहणाऱ्या जुजुन जुनैदी या तरुणाने ट्रॅफिकला वैतागून चक्क हेलिकॉप्टर बनवले आहे.
 

jakarta _1  H x 
दररोजच्या ट्रॅफिकला वैतागून जुजुन जुनैदी या तरुणाने थेट हवेत उडणारे हेलिकॉप्टर बनवण्याचा निर्णय घेतला. या तरुणाने केवळ निर्णय घेतला नाही. तर तो खरा करून दाखवला. जुजुन जुनैदी हा तरूण गाड्यांचा मॅकनिक म्हणून काम करतो. त्याने १८ महिन्यापासून हेलिकॉप्टर बनवणे सुरू केले होते. या हेलिकॉप्टरसाठी १.५० लाख खर्च आल्याचे त्याने सांगितले. या हेलिकॉप्टरची लांबी २६ फूट इतकी आहे. हे हेलिकॉप्टर पेट्रोलवर उडणारे आहे. यात ७०० सीसीचे २३ हॉर्सपॉवरचे जनरेटर बसवण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर बनवण्यात आले असले तरी त्याचे अद्याप उड्डान करण्यात आले नाही, अशी माहिती जुनैदीने दिली आहे.
 

jakarta _1  H x 
हेलिकॉप्टर बनवण्यात आले असले तरी त्याचे उड्डान या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या महिन्यात करण्यात येईल, असे त्याने सांगितले. हेलिकॉप्टर बनवण्यासाठी जुनैदी कमाईतील एक हिस्सा खर्च करीत असल्याचेही त्याने सांगितले. रोजच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकण्यापेक्षा त्याने असे काही करून दाखवण्याचे मनोमनी ठरवले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे अनेक जण कौतुक करीत आहेत.