'बंटी और बबली 2' ची शुटिंग सुरू

    दिनांक :20-Dec-2019
|
-11 वर्षांनी एकत्र दिसणार सैफ अली खान आणि राणी मुखर्जी
मुंबई,
राणी मुखर्जी आणि सैफ अली खान पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिन शेअर करणार आहेत. 'बंटी और बबली 2' या चित्रपटाची शूटिंग सुरु झाली असून यात आपल्याला राणी आणि सैफची यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. यश राज फिल्मचा आगामी चित्रपट 'बंटी और बबली 2' ची घोषणा करण्यात आली असून याच चित्रपटातून राणी आणि सैफची जोडी तब्बल अकरा वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहे.
 
 

saif-rani_1  H  
 
सैफ अली खानच्या आधी या चित्रपटासाठी अभिषेक बच्चनला विचारण्यात आले होते. परंतु, असे सांगण्यात येत आहे की, बिझी शेड्यूलमुळे अभिषेकने याचित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांची जोडी फायनल करण्यात आली. सैफ अली खान आणि राणी मुखर्जींची जोडी याआधी 'हम तुम', 'ता रा रम पम' आणि 'थोडा प्यार थोडा मॅजिक' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये दिसली होती. या ऑन स्क्रिन जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळते. तसेच या चित्रपटात राणी आणि सैफसोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरीही लीड रोलमध्ये दिसणार आहे.
 
 
 
 
दरम्यान, हा चित्रपट राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आलेला 'बंटी और बबली' चा सीक्वल आहे. सैफ अली खानने बोलताना सांगितले की, 'बंटी और बबली 2' सध्याच्या परिस्थितीवर आधारित आहे. हा एक वेगळाच सीक्वल असणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टने मला खरचं प्रभावित केले आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहण्याचा हा चित्रपट आहे. याच कारणामुळे मला स्क्रिप्ट आवडली आणि मी लगेच या चित्रपटासाठी होकार दिला.
 
रानी मुखर्जीने या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले की, पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांची फार पसंती मिळाली होती. त्यांच्या प्रेमानेच यशराज फिल्म्सला सीक्वेल तयार करण्याचा निर्णय घेण्यास प्रेरित केले आहे. 'बंटी और बबली 2' मधील रिअल जोडी म्हणून मला आणि अभिषेकला विचारण्यात आले होते, पण काही कारणांमुळे अभिषेक येऊ शकला नाही. पण एक टीम म्हणून आम्ही सैफचे काम करतो. माझ्याकडे त्याच्यासोबत काम केलेल्या सुखत आठवणी आहेत, आणि 'बंटी और बबली 2' मध्ये काही नवीन प्रयोग करण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या 'बंटी और बबली 2'ची शुटिंग सुरू झाली असून वरुण शर्मा हे दिग्दर्शक असणार आहेत.