धुमधडाक्यात साजरा केला तैमूरचा तिसरा वाढदिवस

    दिनांक :20-Dec-2019
|

taimur_1  H x W 
 
 
सैफ अली खान आणि करीना कपूर खानचा छोटा नवाब तैमूर अली खान अगदी जन्मापासूनच चर्चेत राहिला. या छोट्या नवाबचा एक वेगळा चाहता वर्गच आहे. तैमूरचे नवीन फोटो आला रे आला की, चाहते त्यावर तुटून पडतात. त्याचा नवीन फोटो सोशल मीडियावर येताच तो इंटरनेटवर व्हायरल होतो.या फोटोंवर हजारो लाइक्स आणि कॉमेट्सचा पाऊस पडतो. त्यामुळेच तैमूर हा सर्वात जास्त लोकप्रिय स्टार किड्स पैकी एक आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. आज तैमूर तिसरा वाढदिवस साजरा करतोय. अर्थात त्याच्या वाढदिवसाची पार्टी एकदिवसाची पार्टी एकदिवस आधीच रंगली. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 

taimur_1  H x W 
 

taimur_1  H x W 
 

taimur_1  H x W 
 
या पार्टीतील सर्वात आकर्षणाचा भाग होता, तो तैमूरचा बर्थ डे केक. ख्रिसमसवर आधारित या केकवर एक छोटासा सांता होता.
या पाटीर्ची थीम ख्रिसमसवर आधारित होती.