‘आटपाडी नाईट्स’चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :20-Dec-2019
|
मुंबई,
दुनियादारी फेम अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका असलेला 'आटपाडी नाईट्स' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून सोशल मीडियावर या चित्रपटाची बरिच चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. २ मिनिटे १४ सेकंदाच्या भन्नाट ट्रेलरमध्ये चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार याची कल्पना येते.
 

aatpadi nights_1 &nb 
 
 
वसंत बापूसाहेब खाटमोडे म्हणजेच वश्यचं लग्न एका सुंदर मुलीसोबत होतं. एका ज्योतिषाने सांगितलेली भविष्यवाणी त्याला आठवते आणि इथूनच या चित्रपटाची कथा सुरू होते. ज्योतिषाने सांगितलेल्या रात्रीचा घोळाविषयीची भविष्यवाणी त्याला आठवत राहते आणि हीच भीती त्याच्या डोक्यात गोंधळ निर्माण करते. यासाठी त्याला एक मित्र बंगाली बाबांकडे जाण्याचा सल्ला देतो. वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या येऊ नये यासाठी वश्या काय काय करतो? त्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?तो कसा सुटणार? हे सर्व या ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे.
 
 
 
 
चित्रपटाचा विषय अतिशय संवेदनशील असला तरी विनोदी रंगात दाखवल्यामुळं प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. चित्रपटातील हटके डान्स आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीच उतरत असून अनेकांनी या चित्रपटातील गाण्यावरचे हुक स्टेप चॅलेंज स्विकारले आहे. 'प्रेमाचा जांगडगुत्ता' या गाण्यावर डान्स करत अनेक चाहत्यांनी तसेच मराठी कलाकारांनी या हुक स्टेप चॅलेंज सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितिन सिंधु विजय सुपेकर यांनी केले असून चित्रपटाची कथादेखील त्यांनीच लिहीली आहे. येत्या २७ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.