स्त्री आणि समाज

    दिनांक :20-Dec-2019
|
दीपक वानखेडे
 
 
'अगं बाई...अरेच्या!’ या मराठी सिनेमात चपराशाच्या तोंडी एक संवाद होता- ‘‘बाई आली तेव्हा बरी होती, एक फोन आला नि बाई बिघडली.’’ तो संवाद ऐकताना खूप हसू येतं. पण त्या संवादामागचं गांभीर्य जेव्हा लक्षात येतं, तेव्हा मात्र वाईट वाटतं. ऑफिसची बॉस असणार्‍या त्या कर्तव्यदक्ष स्त्रीला जेव्हा तिच्या रिकामटेकड्या नवर्‍याचा फोन येतो तेव्हा तिचं डोकं बिघडतं आणि तिची चिडचिड वाढते. 

stree _1  H x W 
 
 
बारकाईनं पाहिलं तर असंच लक्षात येते की, बायकांच्या चिडचिडीला बर्‍याच प्रमाणात पुरुष हाच जबाबदार असतो. म्हणजे तो फक्त नवराच असतो असं नाही तर तो ऑफिसमध्ये काम करणारा सहकारी, शेजारी किंवा कुणीही राहू शकतो. पुरुषांकडून होणार्‍या बारीक सारीक वर्तनार्ंगत बायकांना खूप त्रास होतो आणि त्यांची चिडचिड वाढते. पण माणसांच्या ही बाब लक्षात येत नाही. ‘बायकांना अक्कल नसते’ असा ठपका मारून ते नेहमी मोकळे होतात.
 
 
एकदा एका ऑफिसमध्ये चिवडा पार्टी होती. नवर्‍याला वाटलं आज बायकोला खूश करावं. त्यानं तिला फोन केला ‘‘अंग आज रात्रीला तू स्वयंपाक करू नको. आज ऑफिसमध्ये चिवडा पार्टी आहे. मी भरपूर चिवडा खाऊन येणार आहे, तू स्वयंपाक करू नको.’’ म्हणाला.
 
 
ऑफिसमधून तो र्जेव्हा घरी गेला, त्याच्या बायकोनं जेवणाचं ताट त्याच्यापुढे आणलं. त्याला राग आला म्हणाला- ‘‘मी तुझी काळजी करतो. वाटलं आज तुला आराम द्यावा. तुला सांगीतलं होतं स्वयंपाक करू नको. पण तू केलास स्वयंपाक. मी जेवणार नाही.’’
 
 
बायको म्हणाली-‘‘ इतका सारा तो तिखट चिवडा खायाची गरज काय होती. पोट खराब झालं की अॅसिडिटी वाढते. चिवडा खाल्ल्यने पोट नाही भरत. जेवून घ्या. अर्ध्या रात्री भूक लागेलच.’’ तो ‘‘नाही’’ म्हणाला.
 
 
अर्ध्या रात्री त्याला जेव्हा जाग आली, त्याला जाणवलं की आपल्याला भूक लागली आहे. तो गुपचूप किचनमध्ये गेला आणि जेवू लागला. तितक्यात त्याची बायको आली म्हणाली- ‘‘मी ताट आणलं तेव्हा जेवायला काय झालं होतं?’’ तो म्हणाला- ‘‘मला आताही भूक नाही. पण केलेलं अन्न वाया जाईल त्याची मला काळजी आहे.’’ खरं तर त्याला भूक लागली होती, हे बाब तो मान्य करायला तयार नव्हता. त्यामुळे त्याच्या बायकोला त्याचा खूप राग आला.
 
 
 
काही मोजक्या जन्मापासून चिडचिड्या बसाणार्‍या बायको सोडल्या तर बाकी सर्व जवळपास या चिडचिड्या नसतातच. पण पुरुष त्यांना चिडचिड करायला लावायला भाग पाडतो, असे चित्र बर्‍याच ठिकाणी पाहायला मिळते.
एका माणसाच्या नात्यातल्या दूरच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्नला जायला आणि नवरी मुलीला प्रेझेण्ट घ्यायला त्याच्या जवळ पैसा नव्हता. मग तो बायकोला म्हणाला- ‘‘आपण या लग्नाला गेलं पाहिजे आणि आता पैसे नाही तर माझी जी 70 हजारांची एफडी आहे, ते मी मोडणार आहे.‘‘ त्याची बायको म्हणाली- ‘‘असं नका करू, आपल्याजवळ पैसा तसाही कमी आहे, इतक्या दिवसांची ती ठेव त्यावर महिन्याकाळी थोडंफार व्याज येतं. लग्नाला जाणं आवश्यक नाही. कशाला तोडता ती एफडी ? सारे पैसे खर्च होतील आणि गरजेच्यावेळी कुणी पैसा देत नाही.’’
 
 
तो म्हणाला- ‘‘माझ्या नातेवाईकाचं लग्न आहे, तर तुझी जळजळ होतेय, तुझ्या नात्यातलं लग्न राहिलं असतं तर मग तोडली असती तर तुला आनंद झाला असता ना, मला तोडायची आहे, आणि तुलाही सोबत यायचं आहे. लक्षात ठेव. माझ्यामध्ये बोलू नकोस’’
 
 
बायको सभ्य स्वाभावाची होती. ती चूप राहिली. त्यानं एफडी तोडली. आणि कपडे, महागडं प्रेझेण्ट घेतलं. ते नवरा बायको जेव्हा लग्नाला निघणार इतक्यात बाजारात काहीतरी आणावयाचे राहिले म्हणून बाईकवर बाजारात गेले आणि एका कारने त्याची गाडी मागून ठोकली. ते दोघंही दूर जाऊन पडले. अपघात मोठा नव्हता. त्याच्या पायाला आतून मार लागला. त्याच्या बायकोला सुदैवानं काही लागलं नव्हतं. तो तरी तिला घेऊन ताबडतोब लग्नाला निघाला. लग्न लग्नासारखं पार पडलं आणि ते परतले. दोन वर्षे निघून गेले पण त्याच्या त्या दूरच्या भावाने कधी त्याला एक रुपयाचा कॉल करून विचारलं नाही की तुझा दुखावलेला पाय कसा आहे ? मग तो माणूस बायकोला बर्‍याचवेळा म्हणाला- ‘‘मी तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं माझी एफडीपण गेली आणि पायाला दुखणं आलं.’’
 
 
त्या दिवशी मी एसटीतून नागपूरला येत होतो. बस कंडक्टर महिला होती. बसमध्ये गर्दी होती. आणि इतक्या गर्दीतून ती बिचारी तिकीट फाडत पुढे पुढे चालली होती. माझ्या सीटजवळ आली आणि पुढे एक बावाजी बसून होता. त्यानं तिला पैसे दिले आणि म्हणाला ‘‘अर्धी कोंडाळी दे वं बाई!’’ ती कंडक्टर म्हणाली-‘‘ कार्ड दाखवा! ’’ तो रंगेल बावाजी म्हणाला- ‘‘मी दिसतो ना बाई साठच्यावरचा, कायले पाहयजे कार्ड?’’ आता नियमानुसार तिला कार्ड पाहणं गरजेचं होतं. मग तिला राग आला आणि ती म्हणाली- ‘‘बाबाजी, मीपण चेहर्‍यावरून सोळाची दिसून राहिली, तर मी आहे का ? कार्ड दाखवा नाहीतर पूर्ण तिकीट घ्या.’’ तिचं बोलणं हे बाकीच्यांना उद्धटापणाचं वाटलं. पण तिला राग येणं स्वाभाविक होतं. ज्या कठीण परिस्थितीत ती महिला नोकरी करीत आहे, तिला सहकार्य करणं सर्वच प्रवाशांचं कर्तव्य आहे, हे त्या बावाजीला मेल्यावर समजेल काय कुठास ठाऊक?
एका कार्यालयात एक महिला अधिकारी होती. आणि ती तिच्या हाताखालच्या चार कर्मचार्‍यावर खूप चिडचिड करायची. कारण ते सर्व पुरुष कर्मचारी कामचोर होते. एकदा एक महत्त्वाची फाईल एका जणाने पूर्ण केली नाही. आठ दिवसांपासून तो ‘‘आज करतो, उद्या करतो’’ म्हणत होता. आठवड्यानंतर शेवटी ती अधिकारी एक दिवस त्याच्यावर खूप चिडली. म्हणाली- ‘‘आज कोणत्याही परिस्थितीत ती फाईल पाच वाजेपर्यंत मला हवी आहे. नाहीतर उद्या ऑफसला येऊ नका.’’ तो कर्मचारी म्हणााला- ‘‘मॅडम, आज अर्धी झाली तर चालेल का, उद्या पूर्ण करतो. आज मला हाफ डे सुट्‌ हवी आहे.’’
 
 
‘‘कशाला हवी हाफ डे सुट्‌टी ?’’ तिनं विचारलं. तर तो म्हणाला-
‘‘मुलींना आज आईस्क्रिम खायला न्यायचं आहे. उद्यापासून त्यांची शाळा सुरू होत आहे. मग वेळ मिळणार नाही त्यांना!’’ ती ऑफिसर ओरडली- ‘‘इथं महत्त्वाचं काम सोडून तुम्हाला सुट्‌टी हवी आहे. नाही मिळणार सुट्‌टी! जा फाईल पूर्ण करा! ’’ तो जाग्यावर येऊन बसला.
दोन वाजता ती ऑफिसर त्याच्याजवळ आली आणि म्हणाली- ‘‘तुम्हाला हाफ डे सट्टी हवी होती ना, जा निघा, मुली वाट पाहत असतील. फाईल माझ्याकडे आणून ठेवा, बाकी मी पूर्ण करते!’’
तो माणूस आनंदानं निघून गेला पण ऑफिसरचं चांगलेपण त्याच्या लक्षात आलं नाही.
आज सर्वच क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. त्यांना सहकार्य करणं पुरुषांचं कर्तव्य आहे, हे समजून घेतलं पाहिजे.
 
 
 
9766486542