मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक प्रयोग

    दिनांक :21-Dec-2019
|
-आता येतोय केवळ एकच कलाकार असलेला चित्रपट
कुठल्याही विषयावर अभिनयासह जेव्हा कलाकृती सादर केली जाते, तेव्हा त्याला एकपात्री प्रयोग असे म्हटले जाते. आजवर असे प्रयोग प्रामुख्याने रंगभूमीवर खुप मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात आले. हा एकपात्री अभिनव प्रयोग येत्या काळात आता चित्रपटांमध्ये देखील प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. ‘मूषक’ हा पहिला मराठी एकपात्री चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
 

artist_1  H x W 
 
एकपात्री चित्रपट ही कल्पनाच केवढी तरी रोचक आहे. सुनील दत्त यांनी १९६४ साली ‘यादे’ या पहिल्या एकपात्री चित्रपटाची निर्मिती केली होती. अजंठा आर्टस बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. त्यानंतर कमल हसन अभिनित ‘पुष्पक’ हा एकपात्री चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही रसिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आता नवोदित दिग्दर्शक अक्षय शिंदे ‘मूषक’ या एकपात्री चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात अभिनेता अक्षय टांकसळे मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याने यापूर्वी ‘वायझेड’, ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘पार्टी’, ‘हॉस्टेल डेज’ इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मूषक’ची पटकथा प्रताप देशमुख यांनी लिहिली आहे.