नोरा फतेहीचे स्वप्न उतरले सत्यात

    दिनांक :21-Dec-2019
|
'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात वरूण धवन, श्रद्धा कपूर व नोरा फतेही यांनी आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. या ट्रेलरमध्ये वरूण धवन व श्रद्धा कपूर यांच्यासोबत नोरा फतेहीनेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नोराचे चाहते स्ट्रीट डान्सरचा ट्रेलर पाहून खूप आनंदी झाले आहेत. तिचे काम पाहून चाहते तिचे खूप कौतूक करत आहेत.
 

nora _1  H x W: 
 
'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'च्या ट्रेलर लाँचवेळी नोराने तिच्या अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, हा चित्रपट माझे स्वप्न होते आणि आज त्याचा ट्रेलर लाँच झाला आहे. माझे हे बालपणापासूनचे स्वप्न होते, की मी कोणत्यातरी डान्सिंग चित्रपटात काम करावं आणि आज हे स्वप्न सत्यात उतरले आहे. या चित्रपटात सर्व डान्सरना आदर देताना दिसणार आहे. तसेच, त्यांचे कठोर परिश्रमदेखील यात पहायला मिळतील. सर्व डान्सरच्या प्रती माझ्या मनात खूप प्रेम व आदर आहे. मी कॅनडा, मोरक्को व भारतातील सर्व डान्सरचे प्रतिनिधीत्व या मंचावर करते आहे, याचा मला आनंद आहे.
 

nora _1  H x W: 
 
नोराने दिग्दर्शक रेमो डिसुझा यांचे आभार मानत सांगितले की, मी रेमो सरांसोबत एक अल्बम शूट केला होता. तेव्हा मी त्यांना सांगितले होते की मला तुमच्या सिनेमात काम करायचे आहे. त्यांनी मला संधी दिली, त्यासाठी त्यांची मी आभारी आहे. एबीसीडी फ्रेंचायजीचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या दोन्ही सिनेमांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
'स्ट्रीट डांसर 3डी'चे दिग्दर्शन रेमो डिसुझाने केले आहे.