उमेश- प्रियाने सांगितल्या लग्नाच्या आठवणी

    दिनांक :21-Dec-2019
|
मुंबई,
कलर्स मराठीवरील दोन स्पेशल कार्यक्रमामध्ये सगळ्यांची आवडती जोडी पाहायला मिळणार आहे. सेलिब्रिटी आणि कपल्सच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची हौस साऱ्यांनाच असते. स्टार कपल कसे भेटले.. कुठे भेटले.. इथपासून ते लग्नाचा त्यांचा अनुभव आणि आठवणी जाणून घ्यायची इच्छा अनेकांची असते. या सर्व गोष्टी जाणून घेण्याची खास संधी प्रेक्षकांना दोन स्पेशल शोमध्ये मिळणार आहे.
 

umesh -priya _1 &nbs 
आतापर्यंत दोन स्पेशल कार्यक्रमात गुरु- शिष्याची जोडी, भावंडांची जोडी, मित्रांची जोडी येऊन गेली, पण पहिल्यांदाच या कार्यक्रमात नवरा- बायकोची जोडी येणार आहे. मराठी सिनेवर्तुळातल्या हॉट कपल्सपैकी एक म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. दोन स्पेशलच्या कट्यावर हे दोघे खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळीवर मनमोकळ्या गप्पा मारताना दिसणार आहेत. याशिवाय त्यांच्या आठवणी, त्यांची जोडी कशी जमली.. दोघ एकमेकांना किती ओळखतात.. या सर्व गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९.३० वाजता दोन स्पेशल या कार्यक्रमात उमेश कामत आणि प्रिया बापटला प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाबद्दलच्या आठवणी सांगतांना पाहायला मिळणार आहे.