दिल्ली ते बंगालपर्यंत बलबनचे अत्याचारी राज्य

    दिनांक :22-Dec-2019
|
विजय मनोहर तिवारी 
 
भारतातच नाही, तर सार्‍या जगात इस्लामचा इतिहास रक्तपात आणि कत्तलींनी भरलेला आहे. मूळ विचाराच्या तळाशी आपण नंतर जाऊ, परंतु ‘इस्लाम’च्या नावाने जो विचार अरबमधून बाहेर आला, तो फक्त दहशतीच्या जोरावरच आला. इस्लामच्या प्रचारासाठी अरबस्तानातून कधी ‘भिक्खू’ अथवा ‘संन्यासी’ बाहेर पडल्याचे कुणी ऐकले आहे का? त्यांच्यात ही संकल्पनाच नाही. इस्लामचा विचार अरबस्तानाच्या बाहेर प्रत्येक ठिकाणची केवळ सत्ता प्राप्त करण्यासाठीच निघाला. म्हणून इतिहासात प्रत्येक ठिकाणी ‘इस्लामची फौज’ याचेच दाखले सापडतात; कुठल्याही शांतचित्त आणि त्यागी संन्यासी प्रचारकाचे नाही. 

buland_1  H x W 
 
 
हा विचार असा होता, ज्याने आपल्या मार्गात येणार्‍या प्रत्येकावर, सर्व प्रकारच्या अत्याचार व दहशतीला कायदेशीर व धार्मिक वैधता प्रदान केली. त्यामुळे हा विचार ज्या कुणा संस्कृतीशी धडकला, त्या संस्कृतीला मानणार्‍यांनी स्वप्नातही कल्पना केली नसावी की असे काही घडू शकते. फसवणूक-कपट, धोका, लूट, पेटवापेटवी, कत्तली, स्त्रिया-मुलांना गुलाम बनविणे, जुन्या मंदिर-चर्चेसना तोडून तिथे प्रार्थनास्थळ बनविणे इत्यादी सर्व एकदा सत्ता प्राप्त केल्यानंतर अतिशय योजनापूर्वक घडवून आणले.
 
 
इस्लामला मानणार्‍यांनी दिल्लीवर ताबा मिळविल्यानंतरच्या पहिल्या शतकाकडे आपण बघू या. हे शतक प्रचंड तोडफोड, आगी लावणे, उलटापालट आणि रक्तपाताचे होते. ते जाणून होते की, इतक्या प्राचीन परंपरेच्या या समृद्ध प्रदेशात केवळ दहशतीच्या बळावरच टिकून राहता येईल. दुसरा कुठलाही मार्ग नाही. त्यांच्या चार-पाच शतकांच्या अनुभवांचे हेच सार होते आणि ते उघड्या-बोडख्या पहाडी व वाळवंटी प्रदेशात पुन्हा परत जाण्यासाठी थोडेच आले होते. कसेही करून त्यांना येथेच कब्जा करून आपले राज्य कायम करायचे होते. तर काय, गुलाम वंशाच्या सुलतानांच्या अत्याचारी राज्याच्या प्रारंभी त्यांच्यातच झालेला रक्तपात, लुटीचा माल वाटताना डाकूंच्या टोळ्या जशा आपापसात लढतात, अगदी तशाच प्रकारचा होता. जर एक गुलाम दिल्लीचा सुलतान होऊ शकतो, तर इतर गुलामांमध्ये कुठली कमतरता होती? एबकनंतर त्याचा गुलाम शमसुद्दीन इल्तुतमिशने 26 वर्षे राज्य केले. त्याच्यानंतरच्या 30 वर्षांत इल्तुतमिशचे चार मुले िंसहासनावर बसली आणि एकमेकाला ठार करून संपून गेलीत. या काळात बलबन नावाचा एक नायब समोर येतो, जो इल्तुतमिशने खरेदी केलेला गुलाम होता. नायब म्हणजे, आजच्या पंतप्रधानासमक्ष गृहमंत्रीच्या पदाचा. सुलतान जेव्हा दिल्लीच्या बाहेर असायचा, नायब कारभार सांभाळायचा.
 
 
सुलतान झाल्यानंतर बलबन याने प्रथमच दिल्लीच्या इस्लामी राज्याला, राज्य प्रायोजित अत्याचाराचे एक कठोर आवरण दिले. 1266 मध्ये दिल्लीवर त्याचा कब्जा झाला आणि त्याने सुमारे 20 वर्षे राज्य केले. त्याचे तत्त्व होते-
सामान्य जनतेत राज्याची भीती इतकी खोलवर असली पाहिजे की, त्यांनी कधी विरोधाचा विचारही करू नये.
 
 
हे कसे होईल? त्याने स्वत:च्या आसपास सेवकांच्या मजबूत रांगा उभ्या केल्या होत्या. एक रांग द्वारपाल म्हणजे हाजिबांची असायची. सर्वसामान्य लोक सुलतानाच्या आसपासही दिसायला नको म्हणून हे हाजिब सतत सावध असायचे. दुसरी जानदारांची रांग. हे त्याचे अंगरक्षक असायचे. तिसरी रांग नकीबांची. हे सुलतानाची स्वारी जायची तेव्हा त्याच्या समोर आगमनाची ओरडून वर्दी देणारे होते. अशा वेगवेगळ्या जबाबदार्‍या असलेल्या 10 श्रेणींच्या शस्त्रसज्ज लोकांचा घेरा त्याच्या सभोवती असायचा. स्वारीच्या वेळी हे लोक इतका भयानक आरडाओरडा करायचे की, दोन कोस दूरदेखील त्यांचा आवाज भीती निर्माण करायचा. सीसतानी (दक्षिण इराणच्या एका प्रदेशातील लोक) पहिलवानांचा पगार 60 ते 70 हजार जीतल (त्या काळचे चलन) होता. हे भयानक कमांडोंप्रमाणे नंग्या तलवारी चमकवीत बलबनच्या ताफ्यात घोड्यांसोबत चालायचे. त्याने दरबारात येणार्‍यांसाठी आधी पायाचे (कदमबोसी) अथवा जमिनीचे (खाकबोसी) चुंबन घेण्याची पद्धत सुरू केली. याचा अर्थ, बलबनच्या समोर येणारा प्रत्येक जण त्याच्या पायाचे चुंबन घेईल आणि आज मूर्ती किंवा वंदे मातरम्‌च्या संदर्भात इस्लाम याची परवानगी देत नाही, असे जे तर्क देतात, त्या सर्वांच्या पूर्वजांना बलबनच्या पायाचे चुंबन घेताना कधी इस्लामचा हा आदेश आठवला असेल, असे वाटत नाही. लोकशाही त्यांच्या रक्तातच नव्हती. त्यांना केवळ अत्याचाराचीच भाषा समजायची.
 
 
 
इतिहासकार जियाउद्दीन बरनी, या खडतर काळाची झलक दाखविण्यास आपली पावलापावलांवर मदत करतो. जियाउद्दीनचे आजोबा (मातामह)- हुस्माउद्दीन, बलबनच्या दरबारात उच्च पदावर होते. बलबनच्या समक्ष दूरवरून आलेल्या हिंदू राजे-महाराजांनाही खाकबोस म्हणजे जमिनीचे चुंबन घ्यावे लागत असे. बरेचदा तर दरबारातील भीतिदायक वातावरणात ते आश्चर्याने व भीतीने बेशुद्धही पडायचे. दोनशे कोसाच्या इलाक्यातील लोक, बलबनची रुबाबदार स्वारी बघायला गोळा होत असत. दिल्लीत दरबाराचा इतका दबदबा प्रथमच बघायला मिळत होता. बलबनचे मानणे होते-
भीतिशिवाय राज्य करणे शक्य नाही आणि भीतीसाठी शक्ती व दबदबा अतिशय आवश्यक आहे.
 
 
 
बलबनला जियाउद्दीन बरनी याने ‘धर्माचा कट्‌टर अनुयायी’ संबोधून अतिशय मान-सन्मान दिला आहे. बरनी सांगतो- सुलतान झाल्यावर बलबन कधीही इस्लामी शरीयाच्या विरुद्ध गेला नाही. तो रोजे-नमाज अतिशय पाळत असे. तो शुक्रवारच्या तसेच नैमित्तिक नमाजात उपस्थित राहात असे. हजच्या महिन्यात तो रात्रभर नमाज पढायचा. प्रवासात अथवा महालात तो कुराणाचे वेगवेगळे भाग वाचत असायचा. वजू केल्याशिवाय कधीही राहात नसे. विद्वान सोबत असल्याशिवाय कधीही भोजन करत नसे आणि भोजन करताना या विद्वानांशी इस्लाममधील प्रश्नांवर चर्चा करायचा. शुक्रवारच्या नमाजानंतर तो मौलानांना भेटत असे. कुण्या विद्वानाचा मृत्यू झाल्यास त्याच्या शवपेटीला सुलतान खांदा देत असे. जनाजाचा नमाज पढायचा आणि तेरवीच्या (तीजा) कार्यक्रमात भाग घ्यायचा. त्यांच्या कुटुंबीयांना इनाम म्हणून गावे आणि पेन्शन द्यायचा. रुबाबदार स्वारीच्या वेळी कुण्या मशिदीत चर्चा सुरू असलेली त्याला दिसली तर तो घोड्यावरून उतरून ती ऐकत असे. फौजेतील काझींना त्याने ‘हर्मान’ची पदवी दिली होती. (मक्का-मदीना यांना हर्मान म्हटले जाते.)
 
 
बलबनच्या निर्दयीपणाच्या उदाहरणांची, 700 वर्षांपर्यंत प्रत्येक सुलतान, बादशाह, नवाब आणि निझामांनीदेखील देशाच्या प्रत्येक ठिकाणी पुनरावृत्ती केली. परंतु, त्याच्या राज्यातील जी दारुण दृश्ये हिंदुस्थानने एकमुस्त पाहिलीत, तशी दृश्ये दिल्लीच्या मुस्लिम राजवटीत फारच कमी बघायला मिळालीत. दिल्लीच्या दक्षिणेला मथुरा, गुरुग्राम, अलवर आणि भरतपूर हा भाग मेवा लोकांचा होता. म्हणून या भागाला मेवात म्हणतात. (हे मेवा लोक स्वत:ला भगवान राम, कृष्ण व अर्जुनाचे वंशज मानतात. नंतर ते इस्लाममध्ये कन्व्हर्ट झालेत.) बलबनच्या काळात हे मुसलमान झाले नव्हते. ते आपल्या हिंदू परंपरांचे अनुयायी होते. मेहनती, प्रभावशाली व संघटित होते. बलबनच्या काळात मेवा लोकांवर करावयाच्या हल्ल्यांना तर्कसंगत ठरविण्यासाठी अनेक प्रकारचे खोटे आरोप लावण्यात आले. उदा. हे लोक लूटमार करतात. कत्तली करतात इत्यादी. आता सुलतानला आपला निर्णय देणे आवश्यक झाले. सुलतान झाल्याच्या पहिल्याच वर्षी त्याने कारवाई केली. मेवा लोकांच्या भागात बेसुमार जंगलकटाई केली. प्रचंड संख्येत मेवा लोकांची कत्तल केली. त्यांच्या बाया-मुलांना कैद करून आणण्यात आले. मेवा लोकांच्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या प्रदेशात पहिल्यांदा हातातील चाबूक फटकारणार्‍या अफगाणांची नियुक्ती करण्यात आली. राजस्थान आणि हरयाणातील आजच्या मुस्लिम मेवा लोकांना, त्यांच्या पूर्वजांवर काय अत्याचार झालेत, याची काही माहिती असेल असे वाटत नाही.
 
 
आज ‘मॉब लिंचिंग’ शब्द वापरणार्‍या अल्पबुद्धीच्या लोकांनी, हा वजनदार शब्द कुठे वापरायला हवा, याचा जरा विचार केला पाहिजे. खरे मॉब लिंचिंग तर बलबनच्या काळात सुरू होते. हत्यारे घेऊन एखादी उन्मादी गर्दी शिकारी कुत्र्यांप्रमाणे एका प्रदेशावर कशी झडप घालत होती, हे बलबनच्या काळात बघता येईल. असे एकापाठोपाठ एक प्रदेशावर घडत होते. एकापाठोपाठ एक सुलतानाच्या नेतृत्वात आणि एकापाठोपाठ एक शतकात प्रत्येक ठिकाणी हे घडत होते. अगणित निरपराधींची हत्या, अगणित स्त्रिया-मुलांना गुलाम बनविण्याच्या घटनांनी हा इतिहास भरलेला आहे. खरेतर, सरकारच्या संरक्षणात ‘मॉब लिंचिंग’ची उदाहरणे जगात केवळ हिंदुस्थानातच शक्य आहेत. आता बलबनसोबत आपण आजच्या उत्तरप्रदेशातील कटेहर भागात येऊ. हा रामपूर, बरेली, बदायूँ, संभल, मुरादाबाद आणि अमरोहाचा भाग आहे. याला बलबनच्या काळात कटेहर म्हटले जात होते. आपल्या वाचाळतेसाठी कुप्रसिद्ध एक सेक्युलर राजकीय नेता आझम खान याच्या पूर्वजांचा हा भाग, तेव्हा कटेहर नावाने ओळखला जायचा. शतकांपासून कटेहर भागातील हिंदू राजा प्रभावशाली होते. परंतु ते संघटित नव्हते. पृथ्वीराज चौहानच्या पराभवानंतर दिल्लीच्या बदलत्या रंग-ढंगाला दुरून बघत-ऐकतही असतील. दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशात आपल्याला कुणी आव्हान देण्याची एकही शक्यता सोडण्यास बलबन तयार नव्हता. म्हणून गंगा पार करून तो स्वत:च निघाला आणि आपल्या 5 हजार उन्मादी फौजेला कटेहर उद्ध्वस्त करण्याचा हुकूम दिला. जियाउद्दीन बरनीने याचे विवरण लिहिले आहे-
 
 
‘‘सर्व पुरुषांची कत्तल करण्यात आली. स्त्रिया आणि मुलांशिवाय कुणालाही सोडले नाही. आठ-नऊ वर्षांच्या मुलांनाही कापून काढण्यात आले. काही दिवस सुलतान कटेहर भागातच राहिला आणि भीषण नरसंहार करत राहिला. इतके की, कटेहरच्या लोकांच्या रक्ताची नदी जमिनीवर वाहिली. प्रत्येक गाव, जंगल आणि शेतांसमोर प्रेतांचे ढीग लावले. त्याची दुर्गंधी गंगेच्या किनार्‍यापर्यंत येत होती. कटेहरचे हाल बघून आसपासच्या भागातील लोक देखील भीतीने कापू लागले. कटेहरातील सर्व गावे लुटून ती उद्ध्वस्त करून टाकली. या लूटमारीने सुलतानाच्या फौजेला धनवान बनवून टाकले.’’
 
 
बलबनच्या सैन्याने ज्या स्त्रिया-मुलांना गुलामांसारखे बांधून या भागातून नेले असेल, त्या नंतर कुणाच्या हाती लागल्या असतील? त्यांनी येणार्‍या काळात आपल्या निष्पाप मुलाबाळांना, नातू-पणतूंना, स्वत:वर ओढवलेल्या कुठल्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या असतील? परंतु, बलबनच्या अमानुषतेचे सर्वात भयानक दृश्य बंगालने पाहिले.
 
 
आपण जेव्हा बलबनच्या काळातील बंगालची गोष्ट करतो, तेव्हा लक्षात ठेवा की आजचा बांगलादेश, पश्चिम बंगाल आणि बिहार एकत्र होते. हा दिल्लीहून अतिशय दूर असलेला एकमात्र असा भाग होता की, ज्यावर गुलाम वंशाच्या सुलतानांच्या पहिल्याच पिढीने कब्जा केला होता. एबकच्या साथीदार सरदारांनी येथे भयानक हल्ले केले होते आणि दिल्लीच्या कृपाछत्राखाली आपापली राज्ये तयार केली होती. दिल्लीहून खूप दूर असल्यामुळे हे लोक लवकरच स्वतंत्र सुलतान बनत आणि आपली नाणी चलनात आणत असत.
 
 
बलबनच्या काळात तुगरिल नावाच्या तुर्काला बंगालचा शासक बनविले होते. तो लखनौतीहून (जिथे कधी प्राचीन बंगालच्या हिंदू राजवंशांचे राज्य होते) राज्य करायचा. आपल्या अधीन असलेल्या, परंतु जे स्वत:ची शक्ती वाढवत असतील किंवा ज्यांची प्रसिद्धी वाढत असेल, अशा लोकांपासून दिल्लीचे सुलतान अतिशय सावध असायचे. तुगरिलला म्हणून बंडखोर मानले गेले. आपलाच एक मांडलिक आपल्याला आव्हान उभे करत आहे, हे बलबनसाठी सहन करण्यापलीकडचे होते. तुगरिलची अक्कल जागेवर आणण्यासाठी बलबनने दोन वेळा सैन्य बंगालमध्ये पाठविले. परंतु, तुगरिलची तयारी जबरदस्त होती. लुटीच्या मालाच्या ज्या ताकदीवर बलबन माजला होता, त्याच ताकदीने तुगरिलही माजला होता.
 
 
बलबनच्या फौजा दोन्ही वेळा पराभूत होऊन परतल्या. त्यांना हरविण्यासाठी बंगालच्या हिंदूंनीदेखील तुगरिला मदत केली. पराभूत सैन्यातील एक सरदार अमीन खान, बलबनचा खास होता. हा अवध प्रांताचा ‘मुक्ता’ होता. संतापलेल्या बलबनने या पराभूत अमीन खानला अवधच्या दरवाजावरच फाशीवर लटकविले आणि तुगरिलला ठार करूनच परतेन, अशी शपथ घेऊन तो स्वत: दिल्लीहून निघाला. ही मोहीम पूर्ण तीन वर्षे चालली. बलबनने प्रचंड सैन्य घेऊन कूच केले. तुगरिल स्वत:चे कुटुंब, स्त्रिया-मुलांसह, लखनौतीच्या सैन्यासोबत जाजनगरकडे निघाला (आजच्या नौआखलीजवळील शहर). बलबनच्या सैन्यातील आघाडीच्या फळीने, बंजार्‍यांच्या मदतीने तुगरिलला एका जागी घेरले. इथे तुगरिल स्वत:ला सुरक्षित म्हणून थांबला होता. ताबडतोब त्याला पकडण्यात आले. त्याचे डोके कापून आणले गेले. सोबत त्याचा खजिना, बायका-पोरे, हत्ती, विश्वासू अधिकारी, गुलाम व त्यांचे कुटुंबीय असे एकूण 3 हजार लोक पकडण्यात आले. या सर्वांना घेऊन बलबन लखनौती येथे आला. लखनौतीच्या दोन मैल लांब मुख्य बाजारात दोन्ही बाजूला दोरांचे फास लावण्यात आले आणि तुगरिलचे मुले, जावई, अधिकारी, कर्मचारी, गुलाम, सेनापती या सर्वांना जाहीरपणे फासावर लटकविण्यात आले. यात तुगरिलच्या निकट मानण्यात येणारा एक संन्याशीदेखील (दरवेश) होता. हा कलंदर हातापायात लोखंडाचे कडे व साखळ्या अडकवून राहायचा. एकदा तुगरिलने त्याला तीन मण सोने दिले होते. या संन्याशाने या सोन्यापासून स्वत: व आपल्या सोबत्यांसाठी सोन्याचे कडे व साखळ्या तयार केल्या व ते घालणे सुरू केले.
 
 
बलबनच्या आधी बंगालने कधीही जाहीर फाशीच्या शिक्षेचे असे भयानक दृश्य पाहिले नव्हते. जियाउद्दीनचे आजोबा हुस्माउद्दीन यांना लखनौतीच्या व्यवस्थापनाचे (शहनगी) काम सोपविले होते. तो या सर्व घटनांचा साक्षीदार आहे. तुगरिलच्या उरलेल्या कैद्यांना दिल्लीला आणून, सर्वांना धडकी भरावी म्हणून अशीच शिक्षा देण्यात आली. तुगरिलच्या फौजेतील जिवंत राहिलेले हे जे बाया-मुले असतील, ते नंतर अत्याचाराच्या सतत वाढणार्‍या वातावरणात लखनौती आणि सार्‍या बंगालमध्ये नव्या ओळखीसह समोर आलेले लोक असतील. त्याचे वंशज आज पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि बिहारमध्ये कुठल्या चेहर्‍यांनी ओळखायला हवे?
 
 
आम्ही बघतो की, इल्तुतमिश किंवा बलबनचा वंश पुढील 50 वर्षांतच समाप्त झाला. त्यांचे नाव घेणारेही उरले नाहीत. हे हल्लेखोर राज्यकर्ते तर एकमेकांच्या कापाकापीतच समाप्त होत गेले. मग आजच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि उरलेल्या हिंदुस्थानातील मुसलमानांचे पूर्वज भूतकाळात कुणाशी जुळतात?
 
 
लखनौतीचे राज्य बलबनने स्वत:चा मुलगा- मेहमूदला सोपविले. त्याला बुगरा खान असेही म्हणतात. तीन वर्षांच्या या रक्तपातानंतर बंगालहून दिल्लीला परतल्यावर बलबनने बुगरा खानला म्हटले-
‘‘मुख्य बाजारातील या शिक्षेला आणि हत्येला लक्षात ठेवायचे. माझे म्हणणे विसरू नको की, जर हिंद, िंसध, माळवा, गुजरात, लखनौती व सुनार या प्रदेशातील आश्रितांपैकी जो कुणी दिल्लीच्या बादशाहाविरुद्ध बंड करेल आणि तलवार उपसेल, त्याला, त्याच्या बायका-पोरांना, मित्रांना, नातेवाईकांना, कर्मचार्‍यांना आणि समर्थकांना तुगरिलच्या लोकांना दिली तीच शिक्षा दिली जाईल.’’
हे दिल्ली ते बंगालपर्यंत इस्लामच्या नावावर अत्याचारी राज्याच्या प्रारंभीच्या पन्नास-साठ वर्षांतील, हृदयाचा थरकाप उडविणारे प्रसंग आहेत, जे दस्तावेजांमध्ये नोंदविलेले आहेत.