आतिफ अस्लम दुसऱ्यांदा झाला बाबा

    दिनांक :23-Dec-2019
|
मुंबई,
पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतिफ दुसऱ्यांदा बाबा झाला असून आतिफची पत्नी सारा भरवनाने काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला. आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्याने एक प्रेमळ मेसेजही लिहिला आहे. 'दिल दियां गल्ला' सिंगर आतिफने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमच्या घरी नवा पाहूणा आला आहे. बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम आहे. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. माशाअल्लाह बोलायला विसरू नका.' या फोटोमध्ये बाळ टोपी आणि वुलनच्या कपड्यांमध्ये दिसतो. त्याच्याजवळ एक मोठा हत्तीचा टेडी बीअरही आहे.

atif_1  H x W:
 
 
आतिफने बाळाचा फोटो शेअर केल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आतिफ आणि साराने २०१३ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना मोठा मुलगा अहाद आतिफ आहे. काही दिवसांपूर्वी आतिफ हजच्या यात्रेला गेला होता. या यात्रेला जाण्यापूर्वी त्याने कलम ३७० वर आपलं मत व्यक्त केलं होतं.
आतिफ अस्लमने पोस्टमध्ये लिहिले की, 'एक मोठी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करण्यात मला प्रचंड आनंद होत आहे. मी लवकरच माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवासाला सुरुवात करणार आहे. हजला जाण्याआधी मी चाहत्यांची, मित्र परिवाराची सर्वांची क्षमा मागतो. जर मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करा आणि तुमच्या प्रार्थनांमध्ये सदैव लक्षात ठेवा.' पोस्टमध्ये आतिफने पुढे लिहिले की, 'यासोबतच मी काश्मिरींसोबत होत असलेल्या हिंसेची निंदा करतो. अल्लाह काश्मीर आणि संपूर्ण जगातील निष्पाप लोकांची रक्षा करेल.'