मुलीला ट्रोल करणाऱ्यांवर संतापली काजोल

    दिनांक :25-Dec-2019
|
अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या वागण्यामुळे न्यासा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. ती सेलिब्रिटी किड असल्यामुळे तिला अशाप्रकारे ट्रोल केले जाते , असे म्हणत काजोलने संताप व्यक्त केला आहे. न्यासाच्या जागी तुमचे आई-वडिल किंवा कुटुंबीय असते, तर तुम्ही काय केले असते, असा प्रश्न काजोलने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलर्सना विचारला.
 

kajol-nyasa_1   
ट्रोलिंगविषयी ती म्हणाली, ट्रोल करणाऱ्यांच्या डोक्यात कसला विचार असतो, हे माहित नाही. हेच जर तुमच्या बहिणी किंवा आईच्या बाबतीत झाले असते, तर तुम्ही शांत बसाल का? ती जर सेलिब्रिटी किड नसती, तर या ट्रोलिंगला तुम्ही छळवणूक म्हणणार नाही का? आजकाल तर अशा लोकांवर कारवाईसुद्धा केली जाते. ट्रोलिंग हे जरी नावं दिलं असलं, तरी ती एक प्रकारची दादागिरीच आहे. ट्रोल करणारे मूर्ख असतात. त्यांना माहित नसते की ते काय करत आहेत.
याआधी अजयनेसुद्धा न्यासाच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. सेलिब्रिटींची मुले असल्याचा फटका त्यांनी का भोगावा? कधीकधी ते इतके लहान असतात, की फोटोग्राफर्ससमोर कसे वागावे हे त्यांना नाही समजत. त्यांना मुक्त वावरण्याचे स्वातंत्र्य द्या, असे तो म्हणाला होता.