कंगनाचा 'पंगा' 24 तासांत हिट

    दिनांक :25-Dec-2019
|
मुंबई,
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कंगनाच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पण, या ट्रेलरने एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 2019 मध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला ट्रेलर म्हणून पंगाने मान पटकावला आहे. 'पंगा'च्या ट्रेलरने यावर्षी रिलीज करण्यात आलेल्या 'दबंग', 'सुपर 30', 'स्ट्रीट डांसर' यांसारख्या मोठ्या चित्रपटांच्या ट्रेलरलाही मागे टाकले आहे.
 
 
panga _1  H x W
 
आपल्या वक्तव्यांमुळे सतत वादात असणारी बॉलिवुडची क्वीन कंगना राणावत पुन्हा एकदा 'पंगा' घेणार आहे. पण, हा 'पंगा' कोणाशी वाद नसून तिच्या आगामी चित्रपटाचे टायटल आहे. 2018 या वर्षात 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' आणि 'जजमेंटल है क्या' हे दोन चित्रपट सुमार चालल्यानंतर तिचा नवीन वर्षातील हा पहिलाच चित्रपट असणार आहे. त्यामुळचं या चित्रपटाकडून कंगनाला खूप अपेक्षा असणार आहेत.
 
कंगनाचा हा लूक फार वेगळा आहे. पहिली झलक पाहिल्यानंतर 'क्वीन'मधील साधेपणा आणि 'तन्नू वेड्स मन्नू'मधील तिचा लूक आठवतो. दरम्यान, या चित्रपटात कंगना पुन्हा एकदा युनिक कॅरेक्टर घेऊन चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. या चित्रपटाची टॅगलाइन 'जो सपने देखने हैं वो पंगा लेते है' असे आहे.
 
 
 
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अश्व‍िनी अय्यर तिवारी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, पंगा 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, कंगना रणौतचा चित्रपट 'पंगा'चा ट्रेलर लॉन्च होताच अवघ्या 24 तासांत 44 मिलियन व्ह्यूज क्रॉस केले होते. यावरून कंगनाने कोट्यवधी फॅन्सच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे, हे स्पष्ट होते.