'स्‍कॉटलॅन्ड' चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकन

    दिनांक :25-Dec-2019
|
मुंबई,
ऑस्कर हा चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा मानला जातो. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याची यादी आली आहे. बॉलिवूडचा चित्रपट 'गली बॉय' ऑस्कर्सच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर फिल्म मेकर मनीष वात्सल्यचा 'स्‍कॉटलॅन्ड' या चित्रपटाने यंदा बेस्ट फिचर फिल्म या कॅटगरीमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. ऑस्कर्समध्ये नामांकन मिळण्याआधी या चित्रपटाने 62 पुरस्कार पटकावले आहेत.
 
scotland _1  H  
 
दिग्दर्शक मनीष वात्सल्य यांच्या 'स्‍कॉटलॅन्ड' या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा असून आतापर्यंत 62 पुरस्कार आपल्या नावे करणारा हा चित्रपट ऑस्करमध्ये आपली छाप सोडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर जॉनरचा चित्रपट आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलायचे झाले तर, हा चित्रपट मुलींवर होणाऱ्या बलात्कार आणि हत्येवर अवलंबून आहे. या चित्रपटाची कथा काल्पनिक नसून ती एका सत्यघटनेवर आधारित आहे. 
चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर, या चित्रपटात एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात येते. पीडित मुलीचे वडिल आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कायदा आपल्या हातात घेतात. या चित्रपटात अदम सैनी, खूशबू पुरोहित, मनीष वात्‍सल्‍य, चेतन पंडित आणि दया शंकर पांडे मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान, अदम सैनी यांना या चित्रपटासाठी सात वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच, या चित्रपटाची कथा अदम सैनी याने लिहिली असून स्क्रीनप्ले आणि संवाद पियूष प्रियांक यांनी लिहिले आहेत.