वाढदिवसाच्या दिवशी सलमान पुन्हा मामा झाला

    दिनांक :27-Dec-2019
मुंबई,
बॉलिवूडचा दबंग सलमान खान आज त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. फक्त सिनेसृष्टीतूनच नाही, तर संपूर्ण जगभरातून सलमावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजचा वाढदिवस मात्र सलमानसाठी अधिकच खास ठरला आहे. आजच्या दिवशी संपूर्ण खान कुटुंब डबल सेलिब्रेशन करणार आहे. याचे पहिले कारण म्हणजे भाईजानचा ५४ वा वाढदिवस आणि दुसरे कारण म्हणजे सलमानची बहीण अर्पिता दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने मुलीला जन्म दिला.
 

salman_1  H x W 
 
स्वतः अर्पिताने भावाला त्याच्या वाढदिवसाला अनोखी भेट देण्याचे आधीच ठरवले होते. सध्या अर्पिता हिंदूजा रुग्णालयात दाखल आहे. अर्पिताच्या प्रसूतीवेळी संपूर्ण खान कुटुंब रुग्णालयात उपस्थित होते. रिपोर्टनुसार, अर्पिताने मुलीला सी-सेक्शनने जन्म दिला. अर्पिताने सोशल मीडियावर ही गूड न्यूज शेअर करत मुलीचे नावही सांगितले. अर्पिताने तिच्या आयत शर्मा ठेवले आहे. 
 
 

salman_1  H x W 
 
 
अर्पिता खान शर्माचे हे दुसरे बाळ आहे. याआधी तिला आहिल शर्मा हा मोठा मुलगा आहे. सलमान आणि आहिलचे बॉण्डिंग तर साऱ्यांनाच माहीत आहे. सलमानचे भाच्यावर अतोनात प्रेम आहे. सलमान अनेकदा आहिलसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.