हिंसा न करण्याचे अक्षयचे आंदोलकांना आवाहन

    दिनांक :28-Dec-2019
मुंबई,
देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काही भागात आंदोलने केली जात आहे. तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागले आहे. याविषयावर अभिनेता अक्षय कुमारनेही मत मांडले आहे. हिंसा करणे हे माझ्या स्वभावात नाही त्यामुळे मी इतकेच सांगेन हिंसा करू नका, असे अक्षय कुमार म्हणाला. 

akki _1  H x W: 
 
'गुड न्युज' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान अक्षय कुमारला 'समाजात होत असणाऱ्या विरोध आणि निदर्शनांचा बॉलिवूडवर कसा परिणाम होत आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अक्षयनं सावधपणे आपली भूमिका मांडली आहे. 'मला हिंसाचार आवडत नाही, मग तो कोणत्याही पक्षाकडून होत असेल, हिंसा करू नका. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करु नका. तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते एकमेकांसमोर बसून सांगा.' असं अवाहन त्यानं केलं आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं होत आहेत तर दुसरीकडे या कायद्याच्या समर्थनासाठीही लोक रस्त्यावर उतरत आहेत. जामिया मिलीया इस्लामिया आणि एएमयूच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार घडला होता. यानंतर स्वरा भास्कर, सुशांत सिंह, ऋचा चड्ढा, फरहान अख्तर यासारखे अनेक बडे कलाकार विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते.