चंकी पांडेचे लवकरच मराठीत पदार्पण

    दिनांक :28-Dec-2019
मुंबई,
कॉमेडी भूमिका असो किंवा खलनायकाची, प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे आता मराठीतही पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘हाऊसफुल ४’ आणि ‘साहो’ मधील भूमिकेनंतर चंकी पांडेने आपला मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे. समीर पाटील दिग्दर्शित विकून टाक या सिनेमातून चंकी पांडे मराठीत पदार्पण करणार आहे. मराठीत चंकी पांडेची भूमिका काय असेल याबाबतची माहिती समोर आलेली नसली, तरी सिनेमात तो अरब शेख असेल, अशी माहिती आहे.
 
 

chanki pandey_1 &nbs 
 
चंकी पांडे मराठी पदार्पणासाठी अत्यंत उत्सुक आहे. यामागचे कारणही त्याने सांगितले. तो म्हणाला, मराठी सिनेमा करणे ही माझी जुनी इच्छा होती. मी बंगाली, तेलुगू यांसारख्या प्रादेशिक सिनेमातही काम केले आहे. पण मराठीत काम करावे, अशी नेहमीच माझी इच्छा होती. कारण, ही सिनेसृष्टी सर्वोत्कृष्ट कॉमेडी सिनेमा बनवते. याशिवाय ‘घेऊन टाक’ हा माझा आवडता मराठी शब्द आहे, त्यालाच मिळताजुळता असा शब्द ‘विकून टाक’ आहे. त्यामुळे मराठी सिनेमा करण्याचे हेच कारण होते.
 
आपण अशा प्रकारचा सिनेमा पहिल्यांदाच करत असल्याचेही चंकी पांडेने सांगितले. हा सिनेमा ग्रामीण भारतावर आधारित आहे, ज्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील गावांमध्ये चित्रीकरण केले. हा विशेषतः सामाजिक आणि विनोदी सिनेमा आहे, त्यामुळे मला नाही वाटत की, मी असा सिनेमा कधी केला असेल. मला दिग्दर्शकाच्या कामाचीही माहिती आहे आणि मराठी सिनेमात पदार्पण करायचे असेल तर यापेक्षा चांगली भूमिका नसेल, अशी प्रतिक्रिया चंकी पांडेने दिली.