मोना सिंग अडकली लग्नबंधनात

    दिनांक :28-Dec-2019
मुंबई,
‘जस्सी जैसी कोई नहीं’ मालिकेतून जस्सी बनून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मोना सिंग शुक्रवारी विवाहबंधनात अडकली. मोना सिंग आणि तिचा बॉयफ्रेन्ड श्याम गोपालन पारंपरिक पंजाबी पद्धतीने लग्नबंधनात बांधले गेले. लाल रंगाचा लग्नाचा जोडा परिधान केलेल्या मोनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
 
 

mona singh_1  H 
 
 
मोनाने तिच्या लग्नाबद्दल फार गाजावाजा केला नव्हता. कुटुंबीय आणि जवळचे मित्र -मंडळी तिच्या आणि श्यामच्या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते. या नव दाम्पत्याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंजाबी गाण्यांवर ठेका धरणे असो किंवा सेल्फीसाठी पोझ देणे लग्नसमारंभात केलेली धम्माल, मस्ती या फोटो आणि व्हिडिओतून मोनाच्या चाहत्यांना पाहायला मिळाली.
 

mona singh_1  H 
श्याम गोपालन इन्व्हेस्टमेंट बँकर असून तो आणि मोना गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. यापूर्वी अभिनेता करण ऑबेरॉय, अभिनेता विद्युत जामवाल यांच्यांशी मोनाचे नाव जोडले गेले होते. मोनाला यापूर्वी तिच्या लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली की, मी कधीही माझ्या खासगी आयुष्याबद्दल मीडियासमोर बोलले नाही. पण हेही खरे आहे की, ज्या दिवशी माझे लग्न होईल, मी संपूर्ण जगाला याबद्दल सांगेन.