‘लोलिता’ फेम अभिनेत्रीचे निधन

    दिनांक :29-Dec-2019
लॉस एन्जेलिस,
स्टॅन्ली क्युब्रिक्स दिग्दर्शित ‘लोलिता’ या अत्यंत लोकप्रिय चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार्‍या स्यू लियॉन या अभिनेत्रीचे गुरुवारी निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षीचे त्यांची चित्रपटात निवड करण्यात आली होती. काही दिवसांपासून स्यू लियॉन आजारी होत्या.
 

sue lyon_1  H x 
 
 
1946 मध्ये आयोवा येथे जन्म झालेल्या स्यू लियॉन यांचे मूळ नाव स्युलीन लियॉन होते. लहानपणीच त्या लॉस एन्जेलिस येथे स्थलांतरित झाल्या. शालेय वयातच त्यांनी टीव्हीवर काम करण्यास सुरुवात केली. ‘द लॉरेट्टा यंग शो’मधील भूमिकेने त्यांच्याकडे क्युब्रिक्स यांचे लक्ष वेधले गेले. लियॉन यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड ‘लोलिता’साठी मिळाले होते. ‘लोलिता या या’ आणि ‘टर्न ऑफ द मून’ ही गाणीही त्यांनी या चित्रपटासाठी गायली होती.