आम्हीही बघून घेऊ!

    दिनांक :29-Dec-2019
हितेश शंकर
 
 
राजधानी दिल्लीत देशाच्या एका नामांकित शिक्षण संस्थेतील कम्युनिस्ट आंदोलनात ‘राष्ट्रीय गीता’सारखे एक गीत गाजत आहे-
हम देखेंगे...
वो दिन कि जिसका वादा है।
जो लोह-ए-अजल में लिखा है
हम देखेंगे...
 
गाणारे विद्यार्थी तल्लीन होऊन गात आहेत. शिक्षकांच्या वेषात कॉम्रेड डोलत आहेत. माना डोलवत आहेत; विद्यार्थ्यांच्या सुरात सूर मिळविण्यासाठी इतरांनाही अप्रत्यक्ष प्रोत्साहित करत आहेत. शायर फैज यांचे हे गीत ऐकण्यास उत्तमच आहे; परंतु या निष्पाप मुलांना, लोह-ए-अजल कुठल्या भाषेचा शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय, हे माहीत आहे की नाही माहीत नाही. एक विद्यार्थी विचारण्यास सरसावतो, परंतु त्याला कडक नजरेच्या इशार्‍याने चूप केले जाते- उर्दू-फारसीचे कौतुक करण्याऐवजी प्रश्न विचारतो, बेवकूफ!
काही ओळींनंतर सूर वरच्या पट्‌टीत येतात-
जब अर्ज-ए-खुदा के काबे से
सब बुत उठवाए जाएंगे
हम अहल-ए-सफा, मरदूद-ए-हरम
मसनद पे बिठाए जाएंगे...
 
केवळ सूर लक्षात येतात. अर्थहीन प्रकारे विद्यार्थी माना डोलावतात... काही तोंड वाकडे करतात. तो अस्वस्थ विद्यार्थी आपल्या सहकार्‍यांकडे प्रश्नार्थक चेहर्‍यानी बघतो- आमच्या अभ्यासात हे ‘खुदा, काबा आणि बुत’ कुठून येऊन टपकले़! कॉम्रेड प्राध्यापक त्याला पुन्हा, यावेळी जरा गदगदा हलवून, चूप करतात.
 
 

amhihi baghun gheu_1 
 
 
खरेतर, हा अस्वस्थ विद्यार्थीच सार्‍या आंदोलनाच्या डोळ्यांत खुपत असतो. एका महान क्रांतिकारी गीताला हा प्रश्न, आरोपीच्या पिंजऱ्यात कसा काय उभा करू शकतो? मक्केहून मदीना हजरतचा इतिहास, अहले सफा, मरदूद-ए-हरमचा उल्लेख आल्यानंतर, कट्‌टर मजहबी उपमा आणि इस्लामी मान्यतांमध्ये विद्यार्थ्यांचे काय काम, असला प्रश्न कॉम्रेड प्राध्यापकांना का छळतो? आम्हाला या सर्वांमध्ये ओढू नका. निवडणूक आणि लोकशाहीच्या विरुद्ध रक्तरंजित क्रांतीच्या घुमणार्‍या साम्यवादी हुंकारांमध्ये जिहादी उन्मादाची बारीक तान चटकन पकडणारा हा विद्यार्थी खरेच धोकादायक आहे!
 
 
मजहबला अफीम म्हणणारे कॉम्रेड जी बाब सदैव दाबत आले आहेत ती बाब, कॉम्रेड टोळीतील एका मुस्लिम विद्यार्थिनी नेत्याच्या टि्‌वटमध्ये उघड होते. या टि्‌वटच्या निष्कर्षात खोलवर द्वेष घुमत आहे- देशाचा निर्वाचित प्रधान खुनी आहे!... ‘इन्शा अल्लाह’ आणि ‘अल्लाहू अकबर’चे नारे एकदम योग्य आहेत!
कॉम्रेड, इस्लामची अफीम दातांखाली दाबून बसले आहेत.
 
 
विद्यार्थ्याचे डोके पुन्हा भडकते. देशाच्या नामांकित विद्यापीठात लोकशाही वातावरणाच्या नावाने काय काय लिहिले होते! हिंदी-इंग्रजीत तर गोष्टी खूपच प्रगतिशील वाटत होत्या... उर्दूत काय लिहिले होते? अल्लाहू-अकबर! 
कुठे आहे प्रगतिशीलता!
कुठे आहेत धर्माला शिव्या घालणारे प्राध्यापक!
कुठे आहे कट्‌टर जिहादी आणि कॉम्रेड प्राध्यापकात काही अंतर!
तान आणखी वर जाते. गोष्ट जामिया मिल्लिया इस्लामियापर्यंत पोहोचते. पॅलेस्टाईनी पद्धतीच्या पोषाखातील हिंस्र कारस्थानाला उघड करत गोष्ट सीलमपुरात दहशतवादी पद्धतीच्या जाळपोळ आणि दगडफेक्यांपर्यंत पोहचते.
सूर आणखी उन्मादी होतो-
 
हम देखेंगे...
सब ताज उछाले जाएंगे
सब तख्त गिराए जाएंगे...
 
 
अस्वस्थ विद्यार्थी आणि त्याच्या सहकार्‍यांचे चेहरे लालबुंद होतात. उर्दू-फारसी, पॅलेस्टाईनी पोषाख आणि खुनी दगडफेक्यांचे रहस्य त्यांच्या लक्षात येऊ लागते.
पर्वा नसलेला उन्मादी आणखी उच्च स्वरात गात (परंतु एकटा) डोलू लागतो-
...बस नाम रहेगा अल्लाह का
जो गायब भी है हाजिर भी
जो मंजर भी है नाजिर भी
उठेगा अन-अल-हक का नारा
और राज करेगी खल्क-ए-खुदा...
 
परंतु नाही... सुरांचे बेसुरेपण, उद्देशांचे खुनी डाग विद्यार्थ्यांसमोर उघड होऊ लागतात. गर्दी आता अस्वस्थ विद्यार्थी आणि त्याच्या सहकार्‍यांच्या बाजूने होते. प्रश्न सुरांपेक्षा महत्त्वाचा आहे. आम्हाला आपापसात लढवून, रक्तबंबाळ करून, सिंहासने उद्ध्वस्त करूनच तर तुम्ही आला होतात! तुमचा खरा चेहरा यावेळी असा आहे तर... मुठी आवळल्या जातात. प्रत्युत्तराचे आवाज उठतात...
कॉम्रेड! दहशतवादी क्रांती आणि गाणी खूप झालेत, थांबा तुम्ही!
आम्हीही बघू! केवळ तुम्हीच नाही...
आम्हीही बघू...
आता हे आवश्यक आहे!
••