'तानाजी'चं पहिलं गाणं प्रदर्शित

    दिनांक :03-Dec-2019
|
मुंबई,
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा तानाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं. शंकरा रे शंकरा हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित होताच अवघ्या काही वेळात ट्रेण्डही करू लागलं. सोमवारी याच गाण्याचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं होतं. गाण्यात अजय देवगण आणि सैफ अली खान या दोघांचा पावरफुल लुक दिसून येतो. टीझरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार अजयच्या दमदार संवादाने गाण्याची सुरुवात होतं.
 
tanaji_1  H x W
 
गाण्यात अजय, सैफच्यासमोर नाचताना दिसत आहे. या गाण्याआधी १९ नोव्हेंबरला सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात दमदार अॅक्शनसोबत, जबरदस्त संवादही पाहायला मिळाले. पुढच्या वर्षी १० जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
 
 
तानाजी हा अजयचा करिअरमधला १०० वा सिनेमा आहे. याआधी जिगर, दिलवाले, दिलजले, इतिहास, हम दिल दे चुके सनम, इश्‍क विश्‍क, द लेजेंड ऑफ भगत सिंग, राजनीति, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, गोलमाल, सिंघम, दृश्यम यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. अजयच्या नावावर अनेक सुपरहिट सिनेमे आहेत. आता या १०० व्या सिनेमात अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे.