दीपिकाने प्रिया वॉरिअरला दिले चॅलेंज

    दिनांक :30-Dec-2019
मुंबई,
दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी छपाक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एवढंच नाही तर ती दररोज सिनेमाशी निगडीत अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने छपाकचा तिसरा भाग शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती मालतीच्या लुकमध्ये दिसते. तिच्यासोबत सिनेमाची दिग्दर्शिका मेघना गुलझारही दिसत आहेत. व्हिडिओत दीपिका मेघना यांच्याशी बोलताना दिसते आणि शेवटी डोळा मारते. व्हिडिओच्या शेवटी तिने प्रिया वॉरिअरलाही टॅग केले आहे.
 

deepika _1  H x 
दीपिकाने याआधी एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती दिग्दर्शिका मेघना गुलझार यांना शोल्डर मसाज देताना दिसते. मसाज घेताना मेघना म्हणतात की, हा व्हिडिओ चुकीचा मेसेज देईल. यानंतर दीपिका म्हणते की, इतर फोटो आणि व्हिडिओ लिक होतात त्यापेक्षा हा व्हिडिओ लिक झाला पाहिजे. ज्याने लोकांना दिसेल की कॅमेऱ्यामागे दिग्दर्शकाची सेवा करावी लागते.
दीपिकाचा 'छपाक' सिनेमा पुढच्या वर्षी १० जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा अॅसिड अटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे. मेघना गुलझार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून स्वतः दीपिकाने या सिनेमाची निर्मिती केली आहे. मेघना यांनी याआधी तलवार आणि राजी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.