चाहत्याने दिली शाहरुखला धमकी

    दिनांक :30-Dec-2019

shah rukh khan _1 &n 
 
आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते काय करतील याचा नेम नसतो. बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झालेल्या एका चाहत्याने त्याला थेट धमकीच दिली आहे. एक जानेवारीला आगामी चित्रपटाची घोषणा नाही केली, तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी या चाहत्याने दिली आहे. ट्विटरवर सध्या #WeWantAnnouncementSRK हा हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होत आहे. या हॅशटॅगअंतर्गत शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला चित्रपटाची घोषणा करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 

shah rukh khan _1 &n 
 
डिसेंबर २०१८ मध्ये शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याच्यासोबत अनुष्का शर्मा व कतरिना कैफ यांनी मुख्य भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. त्यानंतर किंग खानने चित्रपटांपासून ब्रेक घेतला. गेल्या वर्षभरात त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला आवाहन केले आहे.
 
 
 
 
‘झिरो’नंतर आम्ही तुझा एकही चित्रपट पाहिला नाही. तू लवकरात लवकर चित्रपटाची घोषणा कर, असे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्याने एक जानेवारीपर्यंत चित्रपटाची घोषणा न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. चाहत्यांच्या या ट्विट्सवर आता शाहरुख काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.