स्वित्झर्लंडमध्ये 'विरुष्का'चे न्यू इअर सेलिब्रेशन

    दिनांक :30-Dec-2019
मुंबई,
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नवीन वर्षाचं स्वागत स्विर्त्झलँडमध्ये करणार आहेत. नुकतेच त्यांच्या वेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विराटने स्वतः इन्स्टाग्रामवर त्याचे आणि अनुष्काने फोटो शेअर केले.
 

virushka _1  H  
 
 
चहू बाजूंना बर्फाची चादर पसरलेली आहे. यावेळी अनुष्काने केशरी रंगाचा गरम सूट घातला होता. या फोटोमध्ये दोघं फार आनंदी दिसत आहेत. त्यांचे हे फोटो स्ताड शहरातील आहेत.
 
व्यग्र वेळापत्रक असूनही विराट आणि अनुष्का एकमेकांना नेहमीच वेळ देताना दिसतात. काही दिवसांपूर्वी दोघं भूतान ट्रीपला गेले होते. इथले दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले होते. यावेळी अनुष्का आणि विराटने तिथलं सौंदर्य, शांती आणि अविस्मरणीय अनुभव सांगणारे फोटो शेअर केले होते.