फरहान- शिबानीने घेतली एकत्र 'क्रायोथेरपी'

    दिनांक :04-Dec-2019
|
मुंबई,
अभिनेता फरहान खान आणि शिबानी दांडेकर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे सगळ्यांना माहीत आहे. बॉलिवूड पार्टी असो किंवा कार्यक्रम, सगळीकडे दोघे जोडीने हजेरी लावतात. हे लव्हबर्ड सोशल मीडियावरदेखील तितकेच सक्रिय असून आपल्या चाहत्यांना नेहमी कपल गोल देत असतात. मात्र यावेळी हे लव्हबर्ड एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. नुकतच या दोघांनी सोशल मीडियावर '०क्रायोथेरपी'  घेत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. फरहानने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. 'क्रायोथेरपी... कितीही थंड तापमान असले तरी त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही,' असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला.
 
 
cryotherapy_1  
 
 
क्रायोथेरपी ही मुख्यत्वे स्नायूंना आराम देण्यासाठी घेतली जाते. या थेरपीमध्ये तापमान १०० डिग्रीपेक्षाही कमी ठेवले जाते आणि या थंड तापमानात व्यक्तिला काही मिनिटे रहावी लागतात. नुकतीच फरहान- शिबानीने क्रायोथेरपी घेतल्याचे त्यांच्या फोटोमधून दिसते. यात दोघेही उणे १३० पेक्षाही कमी तापमानात उभे असल्याचे दिसत आहे.
क्रायोथेरपीचा अनुभव कसा होता हे चाहत्यांना सांगण्यासाठी थेरपी घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. दोघंही ही थेरपी एन्जॉय करत असल्याचे त्यांच्या या व्हिडिओवरून दिसून येत आहे.