ईशान खट्टर आणि तब्बू 'या' वेबसिरीजमध्ये दिसणार एकत्र

    दिनांक :04-Dec-2019
|
मीरा नायरची वेब सीरिज 'ए सुटेबल बॉय'चा फर्स्ट लूक समोर आला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ईशान खट्टर आणि तब्बू अशी स्टारकास्ट असलेल्या या सीरिजचा हा फर्स्ट लूक ईशानने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 

web series_1  H 
यामध्ये त्याने आपल्यापेक्षा खूप वर्षांनी मोठ्या असलेल्या तब्बूसोबत काम केले आहे. या सीरिजमध्ये त्यांची काही रोमँटिक दृश्यंदेखील आहेत. त्यामुळे ईशान आणि तब्बू यांची वेगळी जोडी सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतेय.