राणी मुखर्जी झळकणार पत्रकाराच्या भूमिकेत

    दिनांक :04-Dec-2019
|
मुंबई,
सध्या समाजात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे समाजात जागृतता निर्माण करण्यासाठी राणी मुखर्जी पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. राणी तिच्या आगामी 'मर्दानी २' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारा भोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे आणि त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहे.
 

rani mukerji_1   
याच संबंधित आपले मत परखडपणे मांडण्यासाठी ती वृत्तवाहिनीवर निवदीकेच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा राणी समाजात जागृतता निर्माण करण्यासाठी वृत्तवाहिनाची मदत घेणार आहे. त्याचबरोबर समाजात घडत असलेले वास्तव जगासमोर मांडणार आहे. 'मला अपेक्षा आहे की जनता या गोष्टीचा गांभिर्याने विचार करेल. मी सुद्धा एक स्त्री आहे, एक आई आहे. त्यामुळे मला देखील या नराधमांची भिती वाटते. अगदी कमी वयाचे हे अपराधी आहे पण त्यांचे कृत्य फार मोठे आहे.' असे वक्तव्य तिने मिड डे सोबत बोलताना केले.