फिटनेसमध्ये कतरिनाची स्टार अभिनेत्यांना टक्कर

    दिनांक :05-Dec-2019
|
मुंबई,
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सिनेमांसोबतच तिच्या फिटनेससाठी सुद्धा ओळखली जाते. प्रत्येक सिनेमात ती तिचे वेगळेपण जपते. तिचा वेगळा अंदाज नेहमीच पाहायला मिळतो. याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या फिटनेस व्हिडीओची खूप चर्चा आहे. ज्या व्हिडीओमुळे बॉलिवूडचे स्टार कलाकार सुद्धा हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये कतरिना फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्यांनाही टक्कर देताना दिसत आहे.
 

katrina _1  H x 
कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती जिमध्ये घाम गाळताना दिसत आहे. पण तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर बॉलिवूडच्या स्टार कलाकारांनीही धक्का बसला आहे. कारण, या व्हिडीओमध्ये कतरिना फक्त तिच्या जिम पार्टनर्सनाच नाही तर तिच्या ट्रेनरलाही टास्कमध्ये टक्कर देताना दिसत आहे. आजपर्यंत फिटनेससाठी कठीण एक्सरसाइझ करताना अभिनेत्यांना पाहिले होते, मात्र अशाप्रकारे एक्सरसाइझ करणारी कतरिना पहिलीच अभिनेत्री आहे.
 
 
कतरिनाने असे एकूण 4 व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील पहिल्या व्हिडीओमध्ये ती वर्कआउट करताना दोन पुरुषांना कम्पिट करताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती अवजड सामान हातात घेऊन वर्कआउट करताना दिसत आहे. या सर्वातील खास गोष्ट अशी की एकाही व्हिडीओमध्ये तिची एनर्जी कमी जास्त झालेली दिसत नाही. हे व्हिडीओ कतरिनाच्या फिटनेसचे प्रमाण देत नाहीत तर दुसऱ्यांसाठी प्रेरणा सुद्धा आहेत
कतरिनाच्या या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. फराह खानने लिहिले, ‘मी फक्त तुला पाहत राहिले.’ याशिवाय श्रद्धा कपूरने शॉकिंग इमोजी पोस्ट केला तर नर्गिस फाकरीने ‘वॉव’ अशी प्रतिक्रिया दिली. याशिवाय कतरिनाच्या चाहत्यांनीही तिच्या या व्हिडीओंचे कौतुक केले आहे. कतरिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे तर लवकरच ती अक्षय कुमारच्या सूर्यवंशी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.