अक्षयसोबत भूमिका साकारणार मानुषी छिल्लर

    दिनांक :05-Dec-2019
|
मुंबई,
बॉलिवूडचा खिलाडी आभिनेता अक्षय कुमारचे वेळापत्रक सध्या कमालीचे व्यस्त आहे. आगामी चित्रपट 'गुड न्यूज'मध्ये तो अभिनेत्री करिना कपूर खानसोबत दिसणार आहे. शिवाय 'सूर्यवंशी', 'लक्ष्मीबॉम्ब' आणि 'बच्चन पांडे' या चित्रपटांनंतर तो 'पृथ्वीराज' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आहे. या चित्रपटात तो मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सोबत भूमिका साकारणार आहे.
 

manushi _1  H x 
या ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चक्क ३५ भव्य सेटची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये या ऐतिहासिक सेटची निर्मिती होणार आहे. 'पृथ्वीराज महाकाव्या' भोवती चित्रपटाची कथा फिरतानाचे चाहत्यांना अनुभवता येणार आहे. खुद्द अक्षय कुमारने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. 'पृथ्वीराज' चित्रपट २०२० मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. अक्षय चित्रपटात अक्षय पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेला न्याय देणार आहे तर मानुषी त्यांची प्रेयसी संयोगिताच्या भूमिकेत झळकणार आहे.